
आशिया चषक २०२३ स्पर्धेत टीम इंडियानं नेपाळवर दणदणीत विजय मिळवून सुपर फोरमध्ये धमाकेदार एन्ट्री केली. मात्र, कर्णधार रोहित शर्मा आपल्या संघातील सहकाऱ्यांवर नाराज आहे. स्वतः रोहितनं नाराजीचं कारण स्पष्ट केलं आहे.
भारत- नेपाळ या सामन्यात अनेकदा पावसाचा व्यत्यय आला. पावसाच्या खेळानंतर रोहितनं तुफान बॅटिंग केली. भारताला विजय मिळवून दिला. १० विकेट राखून मिळालेल्या विजयानं भारतानं सुपर ४ मध्ये प्रवेश केला. मात्र, तरीही रोहित शर्मा नाखूश होता.
नेपाळनं प्रथम फलंदाजी करताना २३० धावा केल्या. हे आव्हान पार करताना भारताला पावसाच्या अडथळ्याचा सामना करावा लागला. पाऊस थांबला आणि पुन्हा खेळ सुरू झाला. भारताला डकवर्थ लुइस नियमानुसार, २३ षटकांत १४५ धावांचं आव्हान मिळालं.
रोहित शर्मानं ७४ धावा आणि शुभमन गिलनं नाबाद ६७ धावांची खेळी केल्यानं टीम इंडियानं दिमाखदार विजय मिळवला. रोहित शर्मानं या खेळीत ६ चौकार आणि ६ गगनचुंबी षटकार लगावले. रोहित शर्मा सामनावीर ठरला. (Latest Marathi News)
सामन्यानंतर या खेळीनं खूश आहेस का, असं रोहित शर्माला विचारलं. त्यावर मी खरंतर खूश नाही. सुरुवातीला थोडी भीती वाटली होती. पण मी खेळपट्टीवर स्थिरावलो. त्यानंतर संघाला विजयी दिशेने नेले, असं तो म्हणाला.
सामन्यात रोहित शर्मानं लगावलेल्या षटकारानं प्रेक्षक अचंबित झाले होते. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू रोहितनं फ्लिक स्वीप लगावून सीमापार धाडला. 'मी जाणूनबुजून हा फटका खेळलो नाही. मी शॉर्ट फाइनवरून हा फटका खेळणार होतो. सध्याच्या बॅट खूपच भारी आहेत,' असं रोहितनं या बहारदार फटक्याबाबत सांगितलं.
वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीवरही रोहितनं भाष्य केलं. आम्ही येथे आलो तेव्हा आमची वर्ल्डकप टीम कशी असेल, हे आम्हाला ठाऊक होतं. आशिया चषक स्पर्धेमुळं आमच्या संघाला आकार मिळणार नव्हताच कारण या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत फक्त दोनच सामने खेळणार होतो. सुदैवाने पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी आणि दुसऱ्या सामन्यात प्रथम गोलंदाजीची संधी मिळाली. अजूनही खूप मेहनत घ्यावी लागेल. अनेक खेळाडू दुखापतीतून सावरत आहेत. त्यांना लयीत येण्यासाठी वेळ मिळायला हवा, असं रोहित म्हणाला.
नेपाळविरुद्धच्या विजयानंतरही रोहित शर्मानं संघ सहकाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त केली. हार्दिक आणि इशानने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. आज गोलंदाजी तशी बरी होती. पण क्षेत्ररक्षण अत्यंत वाईट झालं. आम्हाला यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असं रोहित म्हणाला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.