रायगडमध्ये होणार RPL T- 20 क्रिकेट स्पर्धा
रायगडमध्ये होणार RPL T- 20 क्रिकेट स्पर्धा |Saam Tv
क्रीडा

रायगडमध्ये होणार RPL T- 20 क्रिकेट स्पर्धा

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

रायगड जिल्हा प्रिमियर लीग कमिटीतर्फे येत्या नोव्हेंबर महिन्यात आरपीएल ट्वेन्टी - 20 क्रिकेट स्पर्धा (RPL) खेळविण्यात येणार आहे. त्याची घोषणा आयोजकांतर्फे गुरूवारी (दि. 8) अलिबाग येथे करण्यात आली. अलिबाग तालुक्यातील कुरूळ येथील माळी समाज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात या स्पर्धेची घोषणा करण्यात आली. यावेळी आरपीएल स्पर्धेचे अधिकृत बोधचिन्ह, वेबसाईड, फेसबुक व इंस्टग्राम अकाउंटचे उद्घाटन करण्यात आले.

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील 25 वर्षांखालील खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र असणार आहे. खेळाडूंची ऑनलाईन माहिती मागविण्यात येणार असून स्पर्धेत आठ संघ खेळणार आहेत.

संघांचे मालक लिलावाद्वारे खेळाडूंची निवड करतील. ज्या खेळाडूंची निवड लिलावाद्वारे झाली नसेल अशा खेळाडूंना देखील स्पर्धेत खेळण्याची संधी दिली जाणार आहे, अशी महिती रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी यावेळी दिली.

या समारंभास रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष तथा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, जिल्हा परिषद सदस्य मनसी महेंद्र दळवी, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा पेण नगरपरिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील, लायन्स क्लब मांडवाच्या अध्यक्ष विद्या अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील, मार्शल आर्टस् कोच प्रियांका गुंजाळ, उद्योजक मार्फ़य फरनेन्डो, रायगड प्रीमियर लीग कमीटीचे अध्यक्ष राजेश पाटील, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष तथा रायगड प्रीमियर लीगचे सचिव जयंत नाईक, आरपीएलचे निमंत्रक कौस्तुभ जोशी आदी यावेळी उपस्थित होते.

Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com