
RR VS RCB IPL 2023: जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोनी संघांमध्ये रोमांचक सामना सुरु आहे. प्लेऑफमध्ये जाण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटक अखेर ५ गडी बाद १७१ धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७२ धावांची गरज आहे.
ग्लेन मॅक्सवेलची झुंझार खेळी..
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५ गडी बाद १७१ धावा केल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली.
या खेळी दरम्यान त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले. तर ग्लेन मॅक्सवेलने ५ चौकार आणि ३ षटकारांचा साहाय्याने ५४ धावांची खेळी केली. शेवटी अनुज रावतने येऊन ११ चेंडूंचा सामना करत ३ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने २९ धावांची खेळी केली. (Latest sports updates)
या सामन्यात अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, केएम आसिफ, युझवेंद्र चहल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.