Nitish Rana Wife: दिल्लीत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, क्रिकेटपटू नीतीश राणा याच्या बायकोचा अज्ञातांकडून पाठलाग

Saachi Marwah: ही स्पर्धा सुरू असतानाच नीतीश राणाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे
saachi marwah
saachi marwahinstagram

Saachi Marwah Threat: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर स्पर्धेतून बाहेर होताच नीतीश राणाला मोठी जबाबदारी मिळाली आहे. आयपीएल २०२३ स्पर्धेत तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करतोय.

त्यामुळे संघाची सर्व जबाबदारी त्याच्यावर आहे. ही स्पर्धा सुरू असतानाच नितीश राणाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ही बातमी साची मारवाह म्हणजेच त्याच्या पत्नीशी संबंधित आहे. काय आहे प्रकरण? जाणून घ्या.

saachi marwah
Arjun Tendulkar Net worth: कोट्यवधींचा वारसदार असणाऱ्या अर्जुनची स्वतःची संपत्ती किती?

एखादा अज्ञात व्यक्ती जर सातत्याने पाठलाग करत असेल तर कोणीही घाबरेल. अशीच काहीशी अवस्था साची मारवाहची देखील झाली आहे. दोन व्यक्ती तिचा सातत्याने पाठलाग करत आहेत. त्यामुळे साची घाबरली आहे.

आता तिचं घराबाहेर पडणं देखील कठीण झालं आहे. तिने इंस्टाग्रामवर स्टोरी शेसे करत याबाबत माहिती दिली आहे. घडलेली घटना तिने पोलिसांना सांगताच,पोलिसांनी देखील तिला धक्कादायक सल्ला दिला आहे. याबाबत देखील तिने माहिती दिली आहे. पोलिसांचा सल्ला ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य होईल. (Latest sports updates)

saachi marwah
Nitish Rana On KKR Loss: घरच्याच मैदानावर पराभव झाल्याने नितीश राणा भडकला! सामन्यानंतर सांगितलं पराभवाचं कारण

दिल्लीत घडली घटना..

साची मारवाह ही आपल्या कारमधून घराच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला. तिने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीनुसार ही घटना दिल्लीतील कीर्ती नगर परिसरातील आहे. दोन अज्ञात तरुण तिचा पाठलाग करताना दिसून आले आहेत. इतकेच नव्हे तर पाठलाग करत असताना त्यांनी तिच्या कारलाही धडक दिली.

रस्त्यावरून जात असताना कोणीतरी आपल्या मागे येत आहे इथपर्यंत ठीक होतं. मात्र ती जिथे जात होती तिथेच हे दोन तरुण येत असल्याचं जाणवलं. त्यानंतर त्यांनी धडक मारल्यानंतर ती आणखी घाबरली.

saachi marwah
IPL Mystery Girl: ती होती हजर अन् कॅमेरामनची पडली नजर! जुही सोबत दिसलेली ‘मिस्ट्री गर्ल’ आहे तरी कोण?

ही घटना घडल्यानंतर साचीने थेट पोलिस स्टेशन गाठलं. तिने दिल्ली पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आणि तातडीने कारवाई करण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी तिला अजब गजब सल्ला दिला.

पोलिस सल्ला देत म्हणाले की, ' आता तू सुरक्षित पोहचली आहेस ना. त्यामुळे आता जे झालं ते विसरून जा. जर या पुढे अशी घटना घडली तर गाडीचा नंबर नोट करून ठेव.' पोलिसांनी दिलेल्या या सल्ल्यामुळे साचीच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com