
नवी दिल्ली : रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणजे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) क्रिकेटच्या मैदानात उतरल्यावर भल्या भल्या फलंदाजांचा थरकाप उडायचा. शोएबने फेकलेल्या वेगवान चेंडूने अनेक दिग्गज फलंदाजांच्या यष्ट्या उडवल्या आहेत. पाकिस्तानच्या (Pakistan) वेगवान गोलंदाजांच्या यादीत शोएबचे नाव अव्वल स्थानी कोरलं गेलं आहे. शोएब जसा त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळं क्रिकेटविश्वात चर्चेत राहिला. तसाच निवृत्तीनंतरही सोशल मीडियावर विविध विषयांवर टीप्पणी करत असल्याने शोएब लाईमलाईट मध्ये आला आहे. दरम्यान, शोएबने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर (Sachin Tendulkar) नुकतीच एक प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना शोएब अख्तरने म्हटलं की, अल्लाह नंतर सचिन तेंडुलकरच आहे, ज्याने मला स्टार बनवलं. २३ वर्षांपूर्वी १९९९ रोजी कोलकात्यात झालेल्या कसोटी सामन्याचाही किस्सा शोएबने यावेळी सांगितला. दरम्यान, त्यावेळी झालेल्या भारत-पाकिस्तानच्या सामन्यात शोएबने सचिनला 'गोल्डन डक'वर आऊट केलं होतं. भारतरत्न सचिन तेंडुलकरने क्रिकेट विश्वात यशाचं उंच शिखर गाठलं आहे.तसंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सचिनच्या नावावर सर्वाधिक धावा आणि शतक ठोकण्याचा विक्रम आजही कायम आहे.
"सचिन तेंडुलकरने मला स्टार बनवलं"
एका स्पोर्ट्स वेबसाईटशी बोलताना शोएब म्हणाला, मी सकलॅन मुश्ताकला तेव्हा विचारलं होतं की, क्रिकेटचा देव कोणाला म्हणतात. तेव्हा मुश्ताक म्हणला सचिन तेंडुलकर. जर मी सचिनला आऊट केलं तर काय होईल ? असं मी मुश्ताकला विचारलं होतं. यावर मुश्ताक म्हणाला मी सचिनला गेल्या दोन कसोटी सामन्यात बाद केलं होतं. त्यानंतर आम्ही एकमेकांवर मिश्किल टीप्पणी केली. त्यानंतर जेव्हा मी सचिनला बाद केलं, त्यावेळी मला अभिमान वाटला. अल्लाहनंतर मला कुणी स्टार केलं असेल तर तो सचिनच आहे.
"संपूर्ण मैदानात शांतता पसरली होती"
शोएबने पुढे सांगितलं, जेव्हा मी सचिनला बाद केलं होतं,तेव्हा संपूर्ण मैदानात शांतता होती. तेव्हा फक्त माझाच आवाज येत होता. मी सचिनला बाद केल्यानंतर त्याच्याशी संवाद साधला. त्यानंतर मी सचिनला सांगितलं, अल्लाह नंतर मला कुणी स्टार केलं सेल तर तो सचिनच आहे. त्यावेळी सचिननं विचारलं असं का ? जर मी तुम्हाला बाद केलं नसतं तर माझ्या मनावर माझा विश्वास बसला नसता. यावर सचिन म्हणाला, तुम्ही हे सर्व डिजर्व्ह करता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.