Sachin Tendulkar Tweet: गिलची तुफान फटकेबाजी पाहून मास्टर- ब्लास्टरही झाला खुश! ट्विट करत म्हणाला...

Sachin Tendulkar On Shubman Gill: या विजयानंतर मास्टर ब्लास्टर सचिनने त्याचे कौतुक केलं आहे.
Shubman gill
Shubman gillsaam tv

RCB VS GT, IPL 2023: विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर एकच खेळाडू चर्चेत राहिला तो म्हणजे शुभमन गिल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभूत करण्यात शुभमन गिलने मोलाची भूमिका बजावली. रविवारी चिन्नास्वामीच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

प्लेऑफमध्ये जाण्याच्या दृष्टीने हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी अतिशय महत्वाचा होता. या महत्वाच्या सामन्यात शुभमन गिलने शतकी खेळी केली आणि आपल्या संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला. या विजयानंतर मास्टर ब्लास्टर सचिनने त्याचे कौतुक केलं आहे.

Shubman gill
IPL 2023 Playoffs Schedule: प्लेऑफचे ४ संघ ठरले! कधी आणि कुठे रंगणार सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

सचिनने केले कौतुक..

गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यातील सामना झाल्यानंतर प्लेऑफचं चित्र स्पष्ट झालं. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या पराभवामुळे मुंबईचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला. दरम्यान या सामन्यानंतर सचिन तेंडुलकरने एक ट्विट केले आहे. ज्यात त्याने पहिल्या सामन्यात शतक झळकवणाऱ्या कॅमेरून ग्रीनचे कौतुक केले आहे.

यासह दुसऱ्या सामन्यात शतक झळकवणाऱ्या विराट कोहली आणि शुभमन गिलवर देखील त्याने कौतुकाचा वर्षाव केला आहे. सचिनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, मुंबई इंडियन्सकडून शुभमन गिल आणि कॅमेरून ग्रीन यांनी चांगली फलंदाजी केली.विराट कोहलीने उत्कृष्ट खेळी करत बॅक टू बॅक सेंच्युरी झळकावली. प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्सला पाहणे खूप छान आहे...' (Latest sports updates)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक १०१ धावांची खेळी केली.

या खेळी दरम्यान त्याने १३ चौकार आणि १ षटकार मारला. तर फाफ डू प्लेसिसने २८ आणि ब्रेसवेलने २६ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ५ गडी बाद १९७ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाकडून शुभमन गिलने सर्वाधिक १०० धावांची खेळी केली. तर विजय शंकरने ७ चौकार आणि २ षटकारांचा साहाय्याने ५३ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने ६ गडी राखून विजय मिळवला. यासह मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com