Suryakumar Yadav Six: सूर्यकुमारचा 'नटराज' स्टाईल षटकार पाहताच क्रिकेटचा देव प्रसन्न! दिली अशी प्रतिक्रिया

Sachin Tendulkar Reaction On Suryakumar Yadav Six: त्याचा षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.
suryakumar yadav
suryakumar yadavtwitter

MI VS GT IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ५७ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने जोरदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने २७ धावांनी जोरदार विजय मिळवला.

या विजयात मुंबईच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यात अवघ्या ४९ चेंडूंचा सामना करत १०३ धावांची खेळी करणारा सूर्यकुमार यादव विजयाचा हिरो ठरला आहे.

या खेळीदरम्यान त्याने ११ चौकार आणि ६ षटकार मारले. दरम्यान त्याचा षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

suryakumar yadav
Suryakumar Yadav Memes: 'तुमचा नादच लई डेंजर,आमचा सूर्या हो गेम चेंजर' तुफानी खेळीनंतर सोशल मीडियावर भन्नाट memes व्हायरल

मिस्टर ३६० म्हणून ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव हा मैदानाच्या चारही बाजुंना शॉट खेळण्यासाठी ओळखला जातो. मुंबईच्या वानखेडे मैदानावरही त्याची अशीच काहीशी कामगिरी पाहायला मिळाली.

त्याने गुजरात टायटन्स संघातील गोलंदाज मोहित शर्मा,अल्झारी जोसेफ आणि मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी केली. यादरम्यान त्याने मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर एक अविश्वसनिय शॉट मारला.

तर झाले असे की, सूर्यकुमार यादव गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई करत असताना हार्दिक पंड्याने चेंडू मोहम्मद शमीच्या हातात दिला. मात्र समोर कोणी ही आला तरी सूर्याला चांगलंच माहित हॉत की, चेंडू हा मैदानाबाहेर पाठवायचा आहे.

suryakumar yadav
Suryakumar Yadav: एकच वादा सूर्या दादा, गुजरातला एकटाच भिडला; शतक ठोकून पांड्यालाही फोडला घाम!

मोहम्मद शमीने तीन स्टंपच्या मध्ये चेंडू टाकला. या चेंडूवर सूर्यकुमार यादव २ पाऊल पुढे आला आणि दिशा देत हाच चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने ६ धावांसाठी मारला. हा शॉट पाहून क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर देखील आश्चर्यचकित झाल्याचे पाहायला मिळाले होते.

या सामन्यानंतर सचिनने सूर्यकुमार यादवच्या शॉटचे कौतुक करणारे ट्विट शेअर केले आहे. या ट्विटमध्ये त्याने सूर्यकुमार यादव आणि मधवालला टॅग केले आहे. या ट्विटमध्ये त्याने लिहिले की, 'सूर्या आज चमकला. त्याने आपल्या इनिंगमध्ये अप्रतिम खेळी केली. मात्र त्याने जो थर्ड मॅनच्या दिशेने शॉट मारला तो अविश्वनीय होता.'

मुंबईचा जोरदार विजय..

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने २० षटक अखेर ५ गडी बाद २१८ धावांचा डोंगर उभारला होता. मुंबई इंडियन्स संघाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक १०३ धावांची खेळी केली. तर ईशान किशनने ३१, विष्णू विनोदने ३० आणि रोहित शर्माने २९ धावांचे योगदान दिले.

गुजरात टायटन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २१९ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाकडून राशिद खानने अप्रतिम फलंदाजी करत ७९ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ३ चौकार आणि १० षटकार मारले. तर डेव्हिड मिलरने ४१ धावांचे योगदान दिले.

विजय शंकरने २९ धावांची खेळी केली. मात्र गुजरातचा संघ विजयापासून २७ धावा दूर राहिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com