sachin tendulkar with mother
sachin tendulkar with motherinstagram

Sachin Tendulkar: मातृदिनाचे औचित्य साधून सचिनने आईसाठी शेअर केली खास पोस्ट! हटके कॅप्शन देत जिंकलं मन

Mother Day 2023: मदर्स डेच्या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने एक खास फोटो शेअर केला आहे

Happy Mothers Day 2023: मदर्स डेच्या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने एक खास फोटो शेअर केला आहे. त्याने आपली आई रजनी तेंडुलकरसह एक क्युट फोटो शेअर केला आहे.

सचिन अनेकदा आपल्या पत्नीसह दिसून आला आहे. अनेकदा सामना पाहण्यासाठी तो पत्नीला सोबत घेऊन जात असतो.

असं असलं तरी देखील आई वरील प्रेम कमी झालेलं नाहीये. तो आपल्या आईची न चुकता भेट घेत असतो. ज्याचे फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत हटके कॅप्शन देखील देत देत असतो.

sachin tendulkar with mother
IPL 2023 Points Table: गुजरातला मागे सोडत CSK करणार Playoff मध्ये प्रवेश?पाहा काय आहे समीकरण

खास फोटो केला शेअर..

प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं स्थान हे सर्वोच्च स्थानी आहे. जन्म देण्यापासून ते मोठं होईपर्यंत आई आपला सांभाळ करत काळजी घेत असते. प्रत्येक व्यक्तीच्या यशात आईचा मोलाचा वाटा असतो. सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव बनवण्यात त्याच्या आईने देखील तितकीच मेहनत घेतली आहे. या खास दिवशी त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तो आपल्या आईचे चरण स्पर्श करताना दिसून येत आहे.

सचिन तेंडुलकरने हा फोटो शेअर करताच सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होऊ लागला आहे. सचिनने या पोस्टला हटके कॅप्शन देखील दिले आहे. त्याने लिहिले की, 'ए आयच्या जगात एकच गोष्ट नाही बदलणार ती म्हणजे ए आई..' (Latest sports updates)

सचिनच्या यशात आईचा मोलाचा वाटा..

सचिन तेंडुलकरला एक यशस्वी क्रिकेटपटू बनवण्यात सचिनच्या आईचा मोलाचा वाटा आहे. सचिनची आई इन्शोरंन्स कंपनीत कार्यरत होती.

तरीदेखील जेव्हा जेव्हा सचिनचा सामना सुरु असायचा, त्यावेळी आवर्जून त्याला सपोर्ट करण्यासाठी हजार असायची. घर,जॉब सांभाळून तिने सचिनला सपोर्ट केला. आज सचिन तेंडुलकर क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com