
Salman Ali Agha Video:
कोलंबोच्या प्रेमदासा मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तानचा हायव्हॉल्टेज सामना सुरू आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला ३५७ धावांचं आव्हान दिलं आहे. सामन्यात पाकिस्तानची पडझड सुरूच असल्याचे दिसत आहे. याचदरम्यान, रवींद्र जडेजाच्या धारदार चेंडूवर पाकिस्तानी फलंदाज सलमान अली आगा दुखापतग्रस्त झाला. सलमानच्या डोळ्याजवळ चेंडू लागताच रक्ताची धार उडाली. (Latest Marathi News)
आशिया कप स्पर्धेतील सुपर-४ मधील भारत विरुद्ध पाकिस्तानचा हायव्हॉल्टेज सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाने मोठा विजय मिळवला. मात्र, या सामन्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. या सामन्यात पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू सलमान अली आगा याच्या डोळ्याजवळ चेंडू लागला.
रवींद्र जडेजाने टाकलेला चेंडू थेट सलमानच्या चेहऱ्यावर डोळ्याजवळ लागल्याने रक्ताची धार उडाली त्यानंतर तातडीने सलमानच्या डोळ्याच्या खाली लागल्याने प्रथमोचार करण्यात आले. प्रथमोचार झाल्यानंतर सलमान पुन्हा खेळण्यास तयार झाला.
तत्पूर्वी, सलमान अली आगा हा फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर हेल्मेट न घालता फलंदाजी करत होता. त्यामुळे चेंडू त्याच्या डोळ्याजवळ लागला. त्याने हेल्मेट घातले असते तर ही घटना टळली असती. चेंडू डोळ्याजवळ लागल्यानंतर सलमानने हेल्मेट घालून फलंदाजीला सुरुवात केली.
२३ धावांवर झाला बाद
भारत विरुद्ध पाकिस्तान या हायव्हॉल्टेज सामन्यात सलमान अलीला फारशी जादू दाखवता आली नाही. पाचव्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी उतरत त्याने ३२ चेंडूचा सामना केला. त्याने ७१.८७ सरासरीने २३ धावा कुटल्या. फलंदाजी करताना सलमानने दोन चौकार लगावले. सलमानला कुलदीप यादवने पायचित केले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.