कुस्तीच्या पंढरीत शड्डूचा आवाज घुमणार; मैदान आयाेजनाने मल्ल खूष
wrestling

कुस्तीच्या पंढरीत शड्डूचा आवाज घुमणार; मैदान आयाेजनाने मल्ल खूष

काेल्हापूर : कुस्ती wrestling पंढरी असलेल्या कोल्हापुरात kolhapur दोन वर्षानंतर शड्डूचा आवाज घुमणार आहे. कोल्हापुरातील शाहू सहकारी साखर कारखान्याने चार ते सहा ऑक्टोबर कालावधीत मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे samarjeet ghatge यांनी पत्रकार परिषदेत दिली. काेविड १९ च्या निर्बंधांमुळे कुस्ती स्पर्धा बंद असल्याने ही स्पर्धा इनडोअर घेण्यात येणार आहेत असेही घाटगेंनी नमूद केले.

कोरोनामुळे corona pandemic कुस्तीची मैदानं बंद असल्याने मल्ल आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना बळ मिळावे या हेतूने ही स्पर्धा आयाेजिल्याची माहिती घाटगेंनी दिली. ते म्हणाले ही स्पर्धा कागल तालुका आणि कारखाना कार्यक्षेत्रातील मल्लांसाठी ३१ विविध गटांत हाेईल.

wrestling
हजर नव्हे..! पत्रकारांशी अधिक न बोलता नारायण राणे निघून गेले

दरम्यान कोरोनाच्या भयाण संकटात सर्वजण अडकले आहेत. आता पुन्हा पहिल्यांदा अशा प्रकारे स्पर्धा होत आहेत. त्यामुळे मल्लांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. राज्यातील इतर कारखान्यांनीही अशाप्रकारे स्पर्धा घ्याव्यात अशी अपेक्षा मल्लांनी व्यक्त केली. यावेळी पैलवान अमोल बुचडे म्हणाले स्पर्धा सुरु हाेणार असल्याने मैदान मारण्यासाठी आम्हांला आता अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com