Sania Mirza Retirement: आता शरीर साथ देत नाहीये, सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा..

कदाचित या सीझननंतर तुम्हाला सानिया टेनिस कोर्टवर खेळताना दिसणार नाही.
Sania Mirza Retirement
Sania Mirza RetirementSaam Tv

Sania Mirza Retirement: नवी दिल्ली: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) च्या चाहत्यांसाठी एक दु:खद बातमी आहे. कदाचित या सीझननंतर तुम्हाला सानिया टेनिस कोर्टवर खेळताना दिसणार नाही. तिने निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे. 2022 हे तिचं शेवटचं सीझन असल्याचे तिने सांगितले आहे. सानियाच्या या निर्णयाने तिच्या चाहत्यांना धक्का बसला असेल (Sania Mirza Announce Retirement After Australian Opne 2022 Be Her Last Season).

Sania Mirza Retirement
Sania Mirza : सानिया मिर्झा घेणार टेनिस मधून निवृत्ती ; 2022 चा हंगाम खेळणार शेवटचा

ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) खेळायला गेलेल्या सानिया मिर्झा (Sania Mirza)ने सांगितले की, हे तिचे शेवटचे सीझन असेल. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतील पराभवानंतर सानिया मिर्झाने ही घोषणा केलीये.

"2022 हा माझा सीझन असेल. मी तयारी करत आहे, परंतु मी पूर्ण सीझन खेळू शकेल की नाही याची खात्री नाही. मला वाटते की मी अधिक चांगले खेळू शकते, पण आता शरीर साथ देत नाहीये. हे माझ्यासाठी सर्वात मोठे दु:ख आहे", असं सानियाने सांगितलं.

Sania Mirza Retirement
IND vs SA: भारताचं पारडं जड, आफ्रिकेला मोठा धक्का; अशी आहे प्लेईंग-11

आत्तापर्यंत भारताच्या फक्त दोन महिला टेनिसपटूंनी WTA चे विजेतेपद पटकावले आहे. सानिया त्यापैकीच एक आहे. एकेरीत टॉप 100 मध्ये पोहोचणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. मात्र, पाठीच्या दुखापतीमुळे तिला एकेरीतून माघार घ्यावी लागली.

जगातील माजी डबल्स नंबर वन टेनिस (Tennis) पटू सानिया मिर्झाने 6 वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे. "या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मी दररोज प्रेरणा शोधते. आता ऊर्जा तशी राहिली नाही. आता पूर्वीपेक्षा जास्त दिवस असचं वाटतं की मला काही करायचे नाहीये. मी नेहमी म्हणते मी तोपर्यंत खेळत राहीन जोपर्यंत मला त्यातून आनंद मिळतोय. पण जे काही चालले आहे ते पाहून मला वाटत नाही की मी त्याचा आनंद घेत आहे", असं सानियाने स्पष्ट केलं.

"मी पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत केली आहे, फीट झाले, वजन कमी केले आहे आणि एक आई म्हणून एक चांगला आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन आईप्रमाणे मी ती स्वप्ने शक्य तितकी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. या सीझननंतर माझे शरीर मला साथ देईल असे वाटत नाही", असंही ती म्हणाली.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com