CWG 2022 : चहावाल्याच्या मुलाचा कॉमनवेल्थ गेम्समध्ये 'तडका'; भारताला मिळवून दिलं सिल्व्हर मेडल, महाराष्ट्रात जल्लोष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकेत सरगरचे केले अभिनंदन.
Sanket Sargar, Common Wealth Games 2022, weightlifting, Sangli.
Sanket Sargar, Common Wealth Games 2022, weightlifting, Sangli.Saam Tv

बर्मिंगहॅम : येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (common wealth games 2022) भारताच्या (india) तसेच सांगली जिल्ह्यातील संकेत महादेव सरगर (Sanket Sargar) याने आज (शनिवार) 55 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये (weightlifting) रौप्य पदक (silver medal) पटकाविले. संकेतच्या यशानं राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पदकाचं (india at commonwealth games 2022) खातं खाेललं आहे. (Sanket Sargar Latest Marathi News)

या स्पर्धेत संकेत सरगरने पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात एकूण 248 किलोसाठी 113 किलो आणि क्लीन आणि जर्क 135 किलो वजन उचललं. सुवर्ण कामगिरी करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु हाेते मात्र परंतु दुसऱ्या क्लीन अँड जर्क लिफ्टवर त्यास दुखापत झाली.

Sanket Sargar
Sanket Sargarsaam tv

तिसऱ्या प्रयत्नात तो परतला, पण त्याच्या उजव्या कोपरा दुखावला हाेता. दरम्यान त्याने मिळविलेल्या यशाचे काैतुक पंतप्रधान नरेंद्र माेदी (Narendra Modi) यांच्यासह अनेकांनी समाज माध्यमातून केले.

संकेत सरगर हा सांगली जिल्ह्यातील आहे. त्याचे वडील महादेव हे चहा विक्रेते आहेत. त्यांचे मूळगाव हे आटपाडी तालुक्यात असून सध्या कुटुंबीय सांगलीत वास्तव्यास आहेत. संकेत गेली दाेन वर्ष पतियाळा येेथे एनआयएस साई केंद्रांत प्रशिक्षण घेत आहे. या स्पर्धेसाठी आम्ही परिश्रम घेतले असून या स्पर्धेत देशास पदक मिळवून देऊ असा विश्वास त्याने स्पर्धेपुर्वी व्यक्त केला हाेता.

Edited By : Siddharth Latkar

साता-याचे खासदार उदयनराजे भाेसले यांनी ट्विट करुन संकेत सरगर याचे अभिनंदन केले आहे. उदयनराजे लिहितात राष्ट्रकुल स्पर्धेत 55 किलो वेटलिफ्टिंग गटात सांगलीच्या मराठमोळ्या संकेत सरगरने भारताला मिळवून दिले पहिले रौप्य पदक. संकेतचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा.

Sanket Sargar, Common Wealth Games 2022, weightlifting, Sangli.
Wimbledon 2022 : कुस्तीच्या पंढरीतील ऐश्वर्या जाधवची विम्बल्डन स्पर्धेसाठी निवड (व्हिडिओ पाहा)
Sanket Sargar, Common Wealth Games 2022, weightlifting, Sangli.
सिक्युरिटी गार्डच्या रायफलमधून सुटलेली गोळी लागून शेतकऱ्याचा मृत्यू, जिल्हा बँकेसमोरील थरारक घटना
Sanket Sargar, Common Wealth Games 2022, weightlifting, Sangli.
Sambhajiraje Chhatrapati : सामाजिक रचना बिघडेल असं बाेलणं राज्यपालांनी टाळावं : संभाजीराजे

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com