
सातारा : मारुल हवेली (जि. सातारा) येथील वेदांत अभय नांगरे (Vedant Nangare) याने स्वित्झर्लंड येथे नुकत्याच झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत उज्जवल यश मिळविले. वेदांतने वयाच्या एकविसाव्या वर्षी आयर्नमॅन किताब पटकाविल्याने त्याचे सातारा (Satara) जिल्ह्यासह कराड तालुक्यात विशेष काैतुक (Sports) हाेत आहे. (Satara Latest Marathi News)
या स्पर्धेत वेदांतने (स्विमिंग 3.9 किलोमीटर, सायकलिंग 180.2 किलोमीटर व रनिंग 42.2 किलोमीटर) हे अंतर साेळा तासापुर्वीच पुर्ण केले. संयाेजकांनी दिलेल्या निश्चित वेळेपुर्वी म्हणजेच चाैदा तास सत्तावीस मिनिटांत वेदांतने ही कामगिरी केल्याने ताे खूप आनंदित झाला हाेता.
या स्पर्धेत भारतासह जगातील विविध देशातून सुमारे पंधराशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्वित्झर्लंड येथील ही स्पर्धा जगातील एक खडतर आयर्नमॅन स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निसर्गाच्या तसेच डोंगराच्या कुशीत ही स्पर्धा घेतली जाते. वेदांत या स्पर्धेची तयारी तीन वर्षांपासून करत होता.
या स्पर्धेची तयारी म्हणून त्याने जवळपास दहा हजार किलोमीटर सायकलिंग तसेच आठशे किलोमीटर स्विमिंग तसेच एक हजार किलोमीटर इतका धावण्याचा सराव तीन वर्षात केला होता. लॉंग डिस्टन्स सायकलिंगसाठी तो कराड- कागल- कराड, कराड- नाईकबा- कराड तसेच कराड उंडाळे गुढे पाचगणी, ढेबेवाडी, मालदन ,मरळी , मारूल हवेली, किरपे ,कराड असे सायकलिंग करत होता.
कोविड काळात स्विमिंग पूल हे बंद असल्याने त्याने परिसरातील विविध तलावात खास करून जिंती येथे सुध्दा स्विमिंगची तयारी केली होती परंतु आपला सराव थांबवला नव्हता. त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह खासदार श्रीनिवास पाटील, रजनीदेवी पाटील तसेच सारंग पाटील यांनी वेदांतला वेळोवेळी प्रोत्साहित केले तसेच विशेष मदत केली.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.