Greatest catch : सीन अबॉटची 'सुपरमॅन' कॅच! बॅट्समन कपाळाला हात लावून बघतच बसला; पाहा VIDEO

Sean Abbott Catch Video: सीन अबॉटने बाऊंड्रीलाईनजवळ एक भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.
Sean Abbott Catch Video
Sean Abbott Catch VideoTwitter

Sean Abbott Catch Video:

आगामी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे.या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने १११ धावांनी मिळवत वनडे मालिकेत १-२ ने कमबॅक केले आहे.

दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियातील खेळाडू सीन अबॉटने बाऊंड्रीलाईनजवळ एक भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Sean Abbott Catch Video)

Sean Abbott Catch Video
IND vs SL, Asia Cup 2023: टीम इंडियावर पहिल्यांदाच ओढवली ही नामुष्की; सामना जिंकला मात्र या नकोशा विक्रमाची झाली नोंद

सीन अबॉटने टिपला क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम झेल..

सोशल मीडियावर दक्षिण आफ्रिका विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की,ऑस्ट्रेलियातील संघातील खेळाडू सीन अॅबॉटने डाईव्ह मारत अविश्वसनीय झेल टिपला आहे.

तर झाले असे की, दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू असताना ऑस्ट्रेलियाकडून ४७ वे षटक टाकण्यासाठी एलिस गोलंदाजीला आला होता. त्यावेळी मार्को यान्सेन ३२ धावांवर फलंदाजी करत होता. एलिसने या षटकातील चौथा चेंडू ऑफ साईडला वाईडच्या अगदी जवळ टाकला.या चेंडूवर यान्सेने ऑफ साईडच्या दिशेने मोठा फटका मारला.

हा चेंडू जेव्हा बॅटला लागला त्यावेळी असं वाटलं होतं की,हा चेंडू थेट बाऊंड्रीलाईनच्या बाहेर जाणार. मात्र असं काहीच झालं नाही. कारण बाऊंड्रीलाईनवर उभ्या असलेल्या सीन अबॉटने बाऊंड्रीलाईनच्या बाहेर जात असलेला चेंडू डाई्व्ह मारत एका हाताने टिपला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. (Latest sports updates)

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करत असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाकडून एडन मार्करमने नाबाद १०२ धावांची खेळी केली.

तर क्विंटन डी कॉकने ८२ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेने या डावात ६ गडी बाद ३३८ धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ७८ धावांची खेळी केली.

तर ट्रेविस हेडने ३८ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाला या डावात अवघ्या २२७ धावा करता आल्या. यासह दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात १११ धावांनी विजय मिळवला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com