Shikhar Dhawan; आयशा मुखर्जी यांचा घटस्फोट?

भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन आणि पत्नी आयेशा मुखर्जी यांचा घटस्फोट झाला आहे. आयेशाने ही बातमी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली
Shikhar Dhawan; आयशा मुखर्जी यांचा घटस्फोट?
Shikhar Dhawan; आयशा मुखर्जी यांचा घटस्फोट?Saam Tv

नवी दिल्ली : भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन Shikhar Dhawan आणि पत्नी आयेशा मुखर्जी Ayesha Mukherji यांचा घटस्फोट Divorce झाला आहे. आयेशाने ही बातमी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. ही पोस्ट सोशल मीडियामध्ये चांगलीच मोठ्या प्रथागत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. शिखर आणि आयेशा यांचे जेव्हा लग्न झाले होते. तेव्हा त्याच्यावर जोरदार टीका झाली होती.

कारण आयोशा त्याच्यापेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. आणि तिचा या अगोदर देखील घटस्फोट झाला होता. पण यावेळी धवनच्या आईने त्याला साथ दिली होती. यामुळे २०१२ साली शिखर आणि आयेशा यांचे लग्न झाले होते. त्यानंतर २०१४ साली शिखर आणि आयेशा यांना मुलगा झाला आणि त्यांनी त्याचे नाव जोराव्हर असे ठेवले होते. पण मागील वर्षी शिखर आणि आयेशा यांच्यामध्ये काही तरी बिघडल्याचे पाहायला मिळाले.

हे देखील पहा-

कारण धवनने आयेशाला सोशल मीडियावर फॉलो करणे सोडून दिले होते. त्यानंतर या दोघांमध्ये विस्तवही जात नसल्याचे सांगितले जात होते. पण आज शेवटी शिखर आणि आयेशा यांनी घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले आहे. आयेशाने जेव्हा शिखबरोबरच्या घटस्फोटाची माहिती दिली. तेव्हा तिने एक पोस्ट देखील लिहली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, या अगोदर माझा एकदा घटस्फोट झाला होता.

Shikhar Dhawan; आयशा मुखर्जी यांचा घटस्फोट?
आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट

यामुळे दुसऱ्यांदा विवाह करताना मी सर्वस्व पणाला लावले होते. मला काही तरी सिद्ध करायच होत. त्यामुळे दुसऱ्यांदा जेव्हा माझे लग्न मोडले तेव्हा माझ्याकरिता हा भयावर अनुभव होता. मला वाटत होतं की, घटस्फोट हा एक वाईट शब्द आहे, पण माझा आता दुसऱ्यांदा घटस्फोट झाला आहे.

पहिल्यांदा जेव्हा माझा घटस्फोट झाला होता. तेव्हा वाटले होते की, मी स्वार्थी व्यक्ती आहे. कारण मी माझ्या आई- वडिलांना निराश केले होते. त्याचबरोबर मुलांनाही योग्य ती गोष्ट देऊ शकत नाही. त्याचबरोबर मी देवाचा देखील अपमान केला आहे. पण आता माझ्या आयुष्यात दुसऱ्यांदा घटस्फोट झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com