
PBKS VS DC IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ६४ वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना पंजाब किंग्ज संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता. मात्र या महत्वाच्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या पराभवासह पंजाबची प्लेऑफमध्ये जाण्याची वाट खडतर झाली आहे. दरम्यान या सामन्यात पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार शिखर धवनने एक भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार शिखर धवन हा आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकापैकी एक आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला फलंदाजीमध्ये हवी तशी कामगिरी करता आली नाही. तो पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला. दरम्यान क्षेत्ररक्षण करताना त्याने डाईव्ह मारत भन्नाट झेल टिपला, जो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
शिखर धवनचा भन्नाट झेल...
तर झाले असे की, दिल्ली कॅपिटल्स संघाची फलंदाजी सुरु असताना पंजाब किंग्ज संघाकडून ११ वे षटक टाकण्यासाठी सॅम करन गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी डेव्हिड वॉर्नर फलंदाजी करत होता. त्यावेळी सॅम करनने स्लोवर चेंडू टाकला ज्यावर डेव्हीड वॉर्नरने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा अंदाज चुकल्याने चेंडू हवेत गेला. त्यावेळी शिखर धवनने धावत जाऊन डाईव्ह मारत भन्नाट झेल टिपला. (Latest sports updates)
दिल्लीचा विजय..
या सामन्याबदल बोलायचं झालं तर पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर दिल्ली कॅपिटल्स संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या डेव्हिड वॉर्नरने ४६ आणि पृथ्वी शॉने ५४ धावांची खेळी केली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या रायले रुसोने नाबाद ८२ धावा केल्या.
या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने २० षटक अखेर २ गडी बाद २१३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाकडून अथर्व तायडेने ५५ तर लियाम लिविंगस्टनने ९४ धावांची खेळी केली. मात्र पंजाबचा संघ विजयापासून १५ धावा राहिला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.