IPL 2022: हेटमायरने तात्पुरता सोडला राजस्थानचा संघ; वेस्ट-इंडिजला रवाना

राजस्थान रॉयलच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
IPL 2022: हेटमायरने तात्पुरता सोडला राजस्थानचा संघ; वेस्ट-इंडिजला रवाना
Shimron HetmyerSaam TV

राजस्थान रॉयलच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांचा तडाखेबाज फंलंदाज शिमरन हेटमायरने राजस्थान रॉयलचा कॅम्प सोडला आहे. कारण शिमरन हेटमायरच्या घरुन गुड न्यूज आली आहे. शिमरन हेटमायर (Shimron Hetmyer) लवकरच बाबा होणार आहे. थोड्याच दिवसात तो पुन्हा संघात सामिल होणार आहे. राजस्थान रॉयलकडे यंदाच्या हंगामाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जाते.

मधल्या फळीत फलंदाजी करताना हेटमायरने संघाला अनेक विजय मिळवून दिले आहे. शेवटच्या सामन्यात हेटमायरने 16 चेंडूत 31 धावांची खेळी केली होती. ज्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले होते. राजस्थानच्या संघाने कालच्या सामन्यात पंजाबवरती सहा गडी राखून विजय मिळवला आहे. IPL 2022 मध्ये संघाचा हा सातवा विजय आहे.

राजस्थानने दिल्या शिमरॉन हेटमायरला शुभेच्छा

हेटमायरने लवकरच संघात सामील होणार आहे. “शिमरॉन हेटमायर त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी आज पहाटे गयानाला गेला आहे आहे. आम्ही त्याला शक्य तितकी मदत करत आहोत आणि आमच्या शुभेच्छा आहेत. तो लवकरच संघात परत येईल” अशी माहिती राजस्थानने ट्वीट करुन दिली आहे.

पुढे राजस्थान रॉयले म्हटले “आम्ही शिमरॉनची मुंबईला परत येण्याची वाट पाहत आहोत. तो आयपीएल 2022 मधील आमच्या उर्वरित सामन्यांसाठी रॉयल्सच्या सेवेत लवकरत येईल, खूप शुभेच्छा, हेट्टी. आम्ही तुझी वडील म्हणून पुन्हा येण्याची वाट पाहत आहोत''. या हंगामात हेटमायरने आतापर्यंत 11 सामन्यांमध्ये 291 धावा केल्या आहेत आणि त्याची सरासरी आणि स्ट्राइक रेट अनुक्रमे 70 आणि 160 पेक्षा जास्त आहे. हेटमायरने यंदाच्या हंगामात खूप चांगली कामगिरी केली आहे. राजस्थानचा संघ सध्या प्लेऑफच्या रेसमध्ये आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.