महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लिमये भारतीय संघाची कॅप्टन

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लिमये भारतीय संघाची कॅप्टन
Shireen Limaye

सातारा : अम्मान (जॉर्डन) येथे होणाऱ्या FIBA महिला आशियायी करंडक बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्टाच्या शिरीन विजय लिमयेकडे shireen limaye भारतीय संघाचे नेतृत्वाची धूरा साेपविण्यात आली आहे. फॉरवर्ड म्हणून खेळणाऱ्या शिरीनने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर आपले काैशल्य सिद्ध करीत पदकांची कमाई केली आहे.

Shireen Limaye
Paralympics : १९ पदकांवर माेहाेर उमटविणारे हे आहेत चॅम्पियन्स

FIBA महिला आशियायी करंडक बास्केटबॉल स्पर्धा २७ सप्टेंबर ते तीन आॅक्टाेबर या कालावधीत रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घाेषणा करण्यात आली. या संघाचे नेतृत्वपदी शिरीन लिमयेची निवड करण्यात आली. या स्पर्धेत भारतीय संघ जपान, कोरिया आणि न्यूझीलंडसह अ गटात आहे.

भारतीय महिला संघ

शिरीन लिमये (कर्णधार), मधु कुमारी, श्रुती अरविंद, एस. पुष्पा, पी.यू. नवनीथा, एस. साठिया, एम. निशांती, वैष्णवी यादव, श्रीकला राणी, अनुमेरिया, स्टेफी निक्सन, एस. सहाना.

मुख्य प्रशिक्षक: झोरान व्हिझिक

प्रशिक्षक: श्रीनिवास मूर्ती आणि एम. मीनलथा

फिजिओथेरपिस्ट: अहाना पुराणिक

पंच : आर. राकेश

shireen-limaye-from-pune-will-lead-the-indian-team-in-the-fiba-womens-asia-cup- basketball-tournament-sml80

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com