शोएब अख्तरने सांगितली मुथय्या मुरलीधरनच्या फलंदाजीची गंमत

161.3 किमी प्रतितास वेगाने तो चेंडू टाकला होता. हे आत्तापर्यंतचे रेकॉर्ड आहे आणि आतापर्यंत कोणीही त्याला तोडू शकले नाही.
शोएब अख्तरने सांगितली मुथय्या मुरलीधरनच्या फलंदाजीची गंमत
शोएब अख्तरने सांगितली मुथय्या मुरलीधरनच्या फलंदाजीची गंमतSaam Tv

शोएब अख्तर (Shoaib Akhtar) हा जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो आणि खेळण्याच्या काळात तो प्राणघातक बाउन्सर आणि वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जात असे. कोणत्याही फलंदाजाला शोएबचा सामना करणे सोपे नव्हते. तो असे धोकादायक चेंडू टाकत असे, ज्यावर फलंदाज फक्त बादच होत नसे तर गंभीर जखमीही होत. 2003 मध्ये शोएबने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान टाकला होता.

161.3 किमी प्रतितास वेगाने तो चेंडू टाकला होता. हे आत्तापर्यंतचे रेकॉर्ड आहे आणि आतापर्यंत कोणीही त्याला तोडू शकले नाही. आता शोएब अख्तरने सांगितले आहे की त्याला कोणत्या फलंदाजाविरूद्ध चेंडू टाकण्यासाठी सर्वात जास्त संघर्ष केला. शोएबच्या म्हणण्यानुसार तो फलंदाज सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग किंवा ब्रायन लारा नव्हता तर श्रीलंकेतील क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन होता.

शोएब अख्तरने सांगितली मुथय्या मुरलीधरनच्या फलंदाजीची गंमत
T-20 मध्ये 'युनिव्हर्स बॉसचा' धमाका; केली विश्वविक्रमाची नोंद

शोएब अख्तरने मुरलीधरनचे नाव घेतल्यानंतर क्रिक्रेट चाहत्यांना धक्का बसला आहे. एका माध्यामाशी बोलताना तो म्हणाला की, मुथय्या मुरलीधरन हा सर्वात चांगला फलंदाज आहे कारण मला त्याला गोलंदाजी करताना सर्वात अवघड जात होते. मी विनोदही करत नाहीये. याचे कारण देताना अख्तर म्हणाला, मला मुरलीधरनने सांगितले होते की मी त्याला बांऊंसर टाकला तर तो मरेल. मुरलीधर अख्तरला म्हणाला होता तू फक्त मला चेंडू टाक मी तुला विकेट देईल. परंतू, मुरलीधर चेंडू हळू टाकला की जोरदार फटका मारायचा आणि म्हणायचा मी चुकूण फटका मारला.

शोएब अख्तरने सांगितली मुथय्या मुरलीधरनच्या फलंदाजीची गंमत
'83' चित्रपटात यशपाल शर्मांच्या भुमिकेत दिसणार जतिन सरना

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या मुरलीधरनने 133 कसोटी आणि 350 एकदिवसीय सामन्यात 1261 आणि 674 धावा केल्या आहेत. ही आकडेवारी कोणत्याही प्रकारे चांगली नाही पण त्याचा स्ट्राईक रेट दोन्ही स्वरुपात 70 पेक्षा जास्त होता. यावरून असे दिसून येते की मुरलीधरनने डू ओर डाय नितीचा अवलंब केला होता, आणि यामुळेच अख्तर त्रस्त झाला होता. पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाबद्दल बोलताना त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 444 बळी घेतले आणि बर्‍याच सामन्यांमध्ये पाकिस्तानला विजय मिळवून दिला. २०११ च्या विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. 45 वर्षीय शोएब अख्तर नेहमीच आपल्या धाडसी आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहतो.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com