WPL 2023: मानधनाच्या आरसीबीने पहिल्यांदा जिंकला सामना; यूपी वॉरिअर्सचा ५ गडी राखून केला पराभव

RCB Victory: स्पर्धेच्या सहाव्या सामन्यात यूपी वॉरिअर्सचा पराभव करत आरसीबीने पहिल्यांदा सामना जिंकत विजयाचा आनंद लुटला
WPL 2023
WPL 2023 Saam tv

UPW Vs RCB: गेल्या १२ दिवसातील ५ व्या पराभवानंतर स्मृती मानधनाच्या आरसीबी संघाला विजयाचा जल्लोष साजरा करण्याची संधी मिळाली. स्पर्धेच्या सहाव्या सामन्यात यूपी वॉरिअर्सचा पराभव करत आरसीबीने पहिल्यांदा सामना जिंकत विजयाचा आनंद लुटला. यूपी वॉरिअर्सने दिलेल्या १३६ धावांचा सहज पाठलाग करत आरसीबीने सामना खिशात टाकला. (Latest Marathi News)

नवी मुंबईतील (Navi Mumbai) डी.वाय.पाटील स्टेडिअम अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघासाठी लकी ठरलं. या सामन्यात ३१ वर्षांच्या शोभना आशाच्या फिरकीने यूपी वॉरिअर्सचा संघ १३५ धावांच्या आतच ढेपाळला.

आरसीबीच्या सोफीने पहिल्याच षटकात देविका वैद्य आणि कर्णधार एलिसा हीलीला माघारी परतवलं. त्यामुळे यूपी वॉरिअर्सची सुरूवातच खराब झाली. यूपीने ८.१ षटकात ५ गडी गमावले.

यानंतर ग्रेस हॅरिस आणि दीप्ती शर्माने चांगली भागिदारी रचली. त्यांनी षटकात ६९ धावांची भागिदारी रचली. त्यांच्या खेळीमुळे संघाची धावसंख्या १०० पार झाली. शेवटी सोफीने काही धावा कुटल्या. १९.३ षटकात सर्वबाद होत यूपीने आरसीबीला १३६ धावांचे आव्हान दिले.

आरसीबीची तुफान फलंदाजी

आरसीबीच्या सोफीने तुफान फलंदाजी केली. सोफीने पहिल्याच षटकात २ चौकार आणि १ षटकार ठोकला. मात्र, सोफीला शेवटच्या चेंडूत तंबूत परतावं लागलं. तर कर्णधार मानधना शून्य धावांवर बाद झाली. त्यानंतर अॅलिस आणि हेदरने डाव सांभाळला. ९ षटक झाल्यावर आरसीबीची धावसंख्या ४ बाद ६० धावा झाल्या होत्या. तर पुढे २० वर्षांच्या कनिका आहूजाने संघाचा डाव सांभाळला.

WPL 2023
IND vs AUS ODI Series : टीम इंडियाला वनडे मालिकेआधी मोठा हादरा; हुकमी एक्का संघाबाहेर, नेमके कारण काय ?

१० ते १३ व्या षटकादरम्यान कनिकाने ६ चौकार आणि १ षटकार ठोकला. याचदरम्यान, ऋचा घोषने सावकाश खेळ दाखवत भागिदारी मजबूत केली. दोघांनी ६० धावांची भागिदारी रचली. दोघांच्या संयमी खेळामुळे डाव सहज आरसीबीने जिंकला. आरसीबीला या स्पर्धेत पहिल्यांदा विजयाचा आनंद साजरा करायला मिळाला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com