Sourav Ganguly Security News: सौरव गांगुलीच्या सुरक्षेत मोठी वाढ! बंगाल सरकार देणार 'Z' श्रेणीची सुरक्षा; का घेतला निर्णय?

Sourav Ganguly's security cover to Z category: ममता बॅनर्जी सरकार आता गांगुलीला झेड श्रेणीची सुरक्षा देणार आहे.
Sourav Ganguly News
Sourav Ganguly NewsSaamtv

Sourav Ganguli Security Update: पश्चिम बंगाल सरकारने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जी सरकार आता गांगुलीला झेड श्रेणीची सुरक्षा देणार आहे. नवीन सुरक्षा व्यवस्थेनुसार बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांवर आठ ते दहा पोलिसांचा पहारा असेल. याआधी Y-श्रेणी सुरक्षा कवचाखाली गांगुलीला तीन पोलिसांचे रक्षण होते. (Saurav Ganguli Latest News)

Sourav Ganguly News
Vaidyanath Sugar Factory Election: वैद्यनाथ साखर कारखाना निवडणुकीत धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय, बहिण-भावातील संघर्ष टाळण्याचा प्रयत्न?

सौरव गांगुलीच्या सुरक्षेत मोठी वाढ

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या (BCCI) माजी अध्यक्षांना यापूर्वी 'वाय' दर्जाची सुरक्षा होती. त्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी (16 मे) सरकारने सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बंगाल सरकारच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “व्हीव्हीआयपी सुरक्षा संपल्यानंतर प्रोटोकॉलनुसार आढावा घेण्यात आला. त्यानंतर गांगुलीची सुरक्षा बदलून झेड श्रेणीत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

का वाढवली सुरक्षा...

मंगळवारी, राज्य सचिवालयाचे प्रतिनिधी गांगुली यांच्या बेहाला कार्यालयात पोहोचले, जिथे त्यांनी कोलकाता पोलिस मुख्यालय लालबाजार आणि स्थानिक पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सौरव गांगुली सध्या त्याच्या टीम दिल्ली कॅपिटल्ससोबत आहे आणि 21 मे रोजी कोलकाता येथे परत येईल. त्या दिवसापासून त्याला Z-श्रेणी सुरक्षा मिळण्यास सुरुवात होईल," असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Sourav Ganguly News
Shevgaon Bandh News : शेवगावात एलसीबीची कारवाई, तिघे अटकेत; चाैथ्या दिवशीही गावात कडकडीत बंद

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) राज्यपाल सीव्ही आनंद बोस, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि राष्ट्रीय सचिव अभिषेक बॅनर्जी यांना झेड प्लस सुरक्षा मिळते. फिरहाद हकीम आणि मोलॉय घटक या मंत्र्यांना झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. भाजपच्या पश्चिम बंगालच्या अध्यक्षा सुकांता मजुमदार यांना सीआयएसएफ सुरक्षेसह झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com