
IND vs AUS ODI Series : भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेतून संघाचा मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज श्रेयस अय्यर बाहेर झाला आहे. टीम इंडियाचे फिल्डिंग कोच टी दिलीप यांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली. श्रेयस लोअर बॅक दुखापतीमुळे शुक्रवारपासून मालिकेला मुकणार आहे.
श्रेयस अय्यर इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये देखील भाग घेऊ शकणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. श्रेयस कोलकाता नाईट रायडर संघाचं नेतृत्व करतो. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) उपचार घेत आहे. (Sports News)
टी दिलीप यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, दुखापत हा खेळाचा एक भाग आहे. आमच्याकडे सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधा आहेत. आम्ही एनसीएच्या संपर्कात आहोत. मात्र श्रेयस या मालिकेत खेळू शकणार नाही.
दुखापतीतून सावरल्यानंतर श्रेयस भारतीय संघात परतला होता. कसोटी सामन्यादरम्यान दुखापतीतून सावरल्यानंतरही त्याला पुन्हा त्रास जाणून लागल्याने मेडिकल टीमने त्याला स्कॅनसाठी नेले. दुखापतीमुळे श्रेयस आयपीएल 2023च्या हंगामाच्या फर्स्ट हाफमधून बाहेर राहण्याची शक्यता आहे.
आयपीएलचा यंदाचा सीजन ३१ मार्चपासून सुरू होत आहे. श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आहे. मात्र त्याच्या अनुपस्थितीत आता संघाला नवीन कर्णधाराचा शोध घ्यावा लागणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.