Mohammad Kaif : हवेत उडत कैफचा जबरदस्त कॅच; प्रत्येकाने परत परत बघावी अशी फिल्डिंग, पाहा VIDEO

Sports News : मोहम्मद कैफने पकडलेला हा जबरदस्त कॅच सध्या सोशम मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Mohammad Kaif
Mohammad Kaif Saam TV

Cricket News : टीम इंडियाचा माजी मिडल ऑर्डर बॅट्समन मोहम्मद कैफ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कैफ उत्तम फिल्डर्सपैकी एक मानला जातो. आज वयाच्या 42व्या वर्षीही त्याच्या फिल्डिगची जादू तशीच कायम आहे. सध्या लिजेंड्स लीग टी20 टुर्नामेंटमध्ये कैफ खेळत आहे. इंडिया महाराजा टीममधून खेळतान एशिया लायन्सविरुद्धच्या सामन्यात कैफने एक अप्रतिम कॅच पकडला आणि वाहवा मिळवली.

मोहम्मद कैफने पकडलेला हा जबरदस्त कॅच सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शनिवारी इंडिया महाराजा विरुद्ध एशिया लायन्स यांच्यातील सामन्यात 9व्या ओव्हरमध्ये प्रग्यान ओझा गोलंदाजी करत होता. ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर उपुल थरंगाने कव्हरच्या दिशेने एक जोरदार फटका लगावला. मोहम्मद कैफन मोठ्या चपळाईने हवेत झेप घेत उजव्या हाताने हवेत ही कॅच पकडली. (Sports News)

Mohammad Kaif
तड तड तड तड....गौतमीचा आतापर्यंतचा सगळ्यात खतरनाक डान्स; Video Viral

वयाच्या 42व्या वर्षी कैफची लवचिकता पाहून सर्वच चकीत झाले. सर्वांना जुना मोहम्मद कैफ आठवला. टीम इंडियातमध्ये खेळताना कैफ आपल्या फिल्डिंगच्या मदतीने समोरच्या टीमवर दबाव टाकायचा. कैफच्या आजूबाजूच्या एरियातून रन घेणे बॅट्समनसाठी सहज गोष्ट नव्हती. तोच कैफ शनिवारी क्रिकेटप्रेमींना मैदानात दिसला.

Mohammad Kaif
IPL 2023: आयपीएलच्या यंदाच्या हंगामात BCCI चं कठोर पाऊल! फ्रेंचायझींची डोकेदुखी वाढणार?

कैफने या सामन्यात तीन कॅच पकडल्या. मात्र तरीही या सामन्यात इंडिया महाराजाचा दारुण पराभव झाला. शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वातील एशिया लायन्स टीमने पहिल्यांदा फलंदाजी करताना 191 धावा केल्या. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना इंडिया महाराजा संघ 106 धावांवर ऑलआऊट झाला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com