
Shubhman Gill : भारतीय संघाचा (Team India) सलामीवीर शुभमन गिलने आपल्या फलंदाजीने सगळ्यांनाच प्रभावित केले आहे. नुकतेच त्याने हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध द्विशतक ठोकले. एकदिवसीय फॉर्मेटमध्ये द्विशतक झळकावणारा शुभमन गिल हा पाचवा भारतीय फलंदाज ठरला.
शुभमन गिलच्या आधी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी हा पराक्रम केला आहे. त्याच्या याच खेळीला इम्प्रेस होऊन सुनील गावस्कर यांनी नवं नाव दिलं आहे. अनेकदा सुनील गावस्कर कॉमेंट्री करताना टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिलचे कौतुक करतात.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान सुनील गावस्कर यांनी शुभमन गिलला नवीन टोपणनाव दिले. हैदराबाद वनडे सामन्यात कॉमेंट्री करताना सुनील गावस्कर यांनी शुभमन गिलला 'स्मूथमन गिल' हे टोपणनाव दिले.
हैदराबाद वनडेनंतर सुनील गावस्कर यांनी शुभमन गिलला सांगितले की, मी तुला नवीन टोपणनाव दिले आहे. तुझी हरकत नसेल याची मला खात्री आहे. यानंतर शुभमन गिलच्या चेहऱ्यावर हसू उमटले. शुभमन म्हणाला की, त्याला हे नाव आवडले, माझी अजिबात हरकत नाही.
शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावून एक मोठा विक्रम केला आहे. शुभमन गिलने 149 चेंडूत 208 धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 19 चौकार आणि 9 षटकार मारले. द्विशतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे.
शुभमनने 23 वर्षे 132 दिवसांत हा पराक्रम केला आहे. त्याच्या आधी हा विक्रम इशान किशनच्या नावावर होता. त्याने वयाच्या 24 वर्षे 145 दिवसात बांगलादेशविरुद्ध वनडेमध्ये द्विशतक झळकावले होते. त्याचबरोबर या यादीत भारतीय कर्णधार रोहित शर्माचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.