WATCH IPL: भडकलेल्या हैदराबादच्या फॅन्सने दिले कोहली... कोहलीचे नारे; LSG च्या खेळाडूंवर फेकले नट बोल्ड -VIDEO

Fans Throws Nut Bold On LSG Players: सनरायझर्स हैदराबाद संघाच्या चाहत्यांनी नको ते कृत्य केल्याचे पाहायला मिळाले आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
SRH VS LSG
SRH VS LSGTwitter

SRH VS LSG IPL 2023: लखनऊ सुपर जायंट्स संघ या हंगामात जोरदार चर्चेत आहे. सामना लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध असेल तर वाद होणारच. असेच काहीसे चित्र गेल्या काही सामन्यांमध्ये पाहायला मिळाले आहे .

आज सनरायझर्स हैदराबाद विरुध्द लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यातही असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले आहे.

यावेळी अंपायरने केलेल्या चुकीमुळे सनरायझर्स हैदराबाद संघाच्या चाहत्यांनी नको ते कृत्य केल्याचे पाहायला मिळाले आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

SRH VS LSG
Rashid Khan Record: सूर्याचं शतक Rashid ने फिकं पाडलं! दिग्गजांना मागे सोडत IPL स्पर्धेत रचला इतिहास

नो बॉल न दिल्याने रंगला वाद ..

सनरायझर्स हैदराबाद संघाची फलंदाजी सुरू असताना अंपायरने आश्चर्यचकित करणारा निर्णय दिल्याचे दिसून आले. लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून १९ वे षटक टाकण्यासाठी आवेश खान गोलंदाजीला आला होता.

या षटकात आवेश खानने कंबरेच्या वर फुल टॉस चेंडू टाकला. फलंदाजी करत असलेल्या अब्दुल समदला वाटले की, हा नो चेंडू आहे. मात्र अंपयारने नो चेंडूचा इशारा केला नव्हता. हे पाहून अब्दुल समदसह क्रिकेट चाहते देखील आश्चर्यचकित झाले.

अब्दुल समदने लगेचच डीआरएसची मागणी केली. मात्र तिसऱ्या अंपायरने देखील हा नो चेंडू नसल्याचा निर्णय दिला. हा निर्णय पाहून सनरायझर्स हैदराबाद संघाचे चाहते नाराज असल्याचे पाहायला मिळाले आहे.

अंपायरने नो चेंडूची मागणी फेटाळताच सनरायझर्स हैदराबाद संघाचे चाहत्यांनी नको ते कृत्य केल्याचे पाहायला मिळाले आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या डग आऊटवर नट बोल्ड फेकण्यात आले आहे. ही घटना घडल्यामुळे १९ व्या षटकात सामना ५ मिनिटांसाठी थांबवण्यात आला होता. तसेच काही चाहत्यांनी विराट.. विराटचे नारे देखील दिले आहेत. (Latest sports updates)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने ६ गडी बाद १८२ धावा केल्या होत्या. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक ४७ धावा केल्या.

अब्दुल समदने ३७ धावांचे योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून प्रेरक मांकडने नाबाद ६४ धावांची खेळी केली. तर निकोलस पुरनने नाबाद ४४ धावांची खेळी करत लखनऊ सुपर जायंट्स संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com