IND vs SL 3rd ODI: बाऊंड्री वाचवताना दोन खेळाडू एकमेकांना जोरदार धडकले, स्ट्रेचरवर न्यावं लागलं बाहेर, पाहा VIDEO

विराट कोहली स्क्वेअर लेगवर मारलेल्या शॉट वाचवण्यासाठी जेफ्री वँडरसे आणि अशेन बंदारा धावले.
IND SL
IND SL Saam TV

IND vs SL 3rd ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकन ​​संघाचे (Srilanka) दोन खेळाडू जखमी झाले आहेत. दोन्ही खेळाडू चौकार वाचवताना एकमेकांवर आदळले. जेफ्री वँडरसे आणि अशेन बंडारा हे खेळाडू एकमेकांना धडकले. अशेन बंडारा याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. मैदानातून त्याला स्ट्रेचरवरबाहेर नेण्यात आले.

इनिंगच्या ४३व्या षटकातील पाचव्या चेंडूवर ही घटना घडली. विराट कोहली स्क्वेअर लेगवर मारलेल्या शॉट वाचवण्यासाठी जेफ्री वँडरसे आणि अशेन बंदारा धावले. मात्र चेंडू पकडण्याच्या नादात दोघेही एकमेकांना धडकले.

IND SL
Ind vs SL ODI Series: कोहली काही थांबेना! श्रीलंकेविरुद्ध वादळी शतक; नावावर केले 2 विराट रेकॉर्ड

बंडारा याची दुखापत अत्यंत गंभीर आहे. श्रीलंकेच्या खेळाडूंच्या मदतीसाठी टीम इंडियाची मेडिकल टीम देखील मैदानावर दाखल झाली होती. दोन्ही खेळाडू धडकेनंतर ज्याप्रकारे मैदानात पडून होते, त्यावरुन प्रेक्षकांचीही धाकधूक वाढली होती. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरही काळजी दिसत होती. (Sports News)

मेडिकल टीमने दोन्ही खेळाडून उपचारासाठी मैदानाबाहेर नेलं. त्यानंतर धनंजय डिसिल्व्हा आणि ड्युनिथ वेलालेगे हे खेळाडू मैदानात आले आणि खेळ सुरू होऊ शकला.

IND SL
Ind Vs SL ODI Series: शुभमन गिलची कमाल! तिसऱ्या वनडेत तडाखेबंद शतकी खेळी; गंभीरचाही रेकॉर्ड मोडला

भारताचं श्रीलंकेसमोर ३९१ धावांचं आव्हान

भारताने श्रीलंकेला विजयासाठी 391 धावांचे लक्ष्य दिले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 5 गडी गमावून 390 धावा केल्या. स्टार फलंदाज विराट कोहली आणि शुभमन गिल यो दोघांनी धडाकेबाज शतक साजरं केलं.

कोहलीने 110 चेंडूत नाबाद 166 धावा केल्या. यादरम्यान त्याने 13 चौकार आणि 8 षटकार मारले. त्याचवेळी शुभमन गिलने 116 धावांचे योगदान दिले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com