Neymar Record: नेमारने पेलेंना सोडलं मागे, ब्राझिलकडून अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Neymar Jr. News: नेमारने पेलेंचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
neymar jr and pele
neymar jr and pelesaam tv

Neymar Record:

ब्राझिलचा स्टार खेळाडू नेमार पून्हा एकदा चर्चेत आला आहे.यावेळी चर्चेत येण्याचं कारण हटके आहे. नुकताच त्याने माजी फुटबॉलपटू पेलेचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. नेमार आता ब्राझिलसाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने बोलीवीया संघाविरूद्धच्या सामन्यात हा ऐतिहासिक कारनामा केला आहे.

neymar jr and pele
Neymar Jr In Pune: ठरलं! ब्राझीलचा स्टार नेमार खेळणार पुण्यात; मुंबई सिटीविरूद्ध या मैदानावर रंगणार सामना

बोलीवीया विरूद्ध ब्राझिलच्या सामन्यात नेमारने आपल्या कारकिर्दीतील ७८ वा गोल केला आहे. यासह त्याने पेलेचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. बोलीवीयाच्या सामन्यात सुरूवातीपासूनच नेमार फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले होते.

हा ऐतिहासिक गोल त्याने सामन्यातील ६१ व्या मिनिटाला केला आहे. या सामन्यातील १७ व्या मिनिटाला गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र या पेनल्टीचा नेमारला फायदा घेता आला नाही. त्याने जर हा गोल केला असता तर सामन्याच्या १७ व्या मिनिटालाच पेलेचा रेकॉर्ड मोडला गेला असता.

ब्राझिल संघासाठी केवळ २ असे खेळाडू आहेत ज्यांनी ७० गोल करण्याचा रेकॉर्ड केला आहे. या दोघांशिवाय इतर कुठल्याही खेळाडूला ७० गोलचा आकडा पार करता आलेला नाही. नेमारने नुकताच दुखापतीतून सावरत कमबॅक केलं आहे.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तो गंभीर दुखापतग्रस्त झाला होता. २०२२ मध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेत तो ब्राझिल संघाचे प्रतिनिधीत्व करताना दिसून आला होता. (Latest sports updates)

neymar jr and pele
Neymar Jr: बाबो! लक्झरी कार, २५ खोल्यांचं घर अन् बरच काही; नेमारला मिळणार या सुविधा

अल हिलाल संघासोबत करार..

काही दिवसांपूर्वीच नेमारने अल हिलालसोबत करार केला आहे. त्याला या संघासाठी २ वर्षांसाठी खेळण्यासाठी ९०० कोटींपेक्षाही अधिकची रक्कम मिळणार आहे.

गेली ५ वर्षे त्याने पॅरीस सेंट जर्मन संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. आता तो सौदी प्रो- लीग स्पर्धेत तो ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या विरोधात खेळताना दिसून येणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com