Shaheen Afridi Marriage: आफ्रिदी दुसऱ्यांदा अडकणार विवाह बंधनात! समोर आलं हटके कारण..

Asia Cup 2023: शाहीन आफ्रिदी दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकणार आहे.
Shaheen Afridi Marriage
Shaheen Afridi Marriagesaam tv

Shaheen Afridi To Marry Again:

सध्या पाकिस्तानात आणि श्रीलंकेत आशिया चषक २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. रविवारी या स्पर्धेत भारत- पाकिस्तान यांच्यातील सुपर ४ चा सामना रंगणार आहे. १७ सप्टेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.

ही स्पर्धा झाल्यानंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकणार आहे. त्याने पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा सोबत विवाह केला होता.

आता तो अंशासोबतच दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकणार आहे. माध्यमातील वृत्तानूसार हा विवाह सोहळा १९ सप्टेंबरला पार पडणार आहे.

Shaheen Afridi Marriage
World Cup 2023: शोएब अख्तरची मोठी भविष्यवाणी! एका शब्दात सांगितलं कोण उचलणार वर्ल्डकपची ट्रॉफी

शाहीन आफ्रिदी यापूर्वी देखील विवाह बंधनात अडकला आहे. मात्र पहिल्यांदा जेव्हा तो विवाह बंधनात अडकला होता. त्यावेळी विवाह सोहळ्याला त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी आणि मोजक्याच क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती.

यादरम्यान बाबर आझम आणि शादाब खानसारखे खेळाडू देखील उपस्थित होते. आता दुसऱ्यांदा होत असलेला हा विवाह सोहळा मोठ्या धुमधडाक्यात होणार आहे. माध्यमातील वृ्त्तानुसार १९ ला लग्न तर २१ तारखेला रिसेप्शनचा कार्यक्रम असणार आहे. (Latest sports updates)

शाहीन आफ्रिदी आशिया चषकात पाकिस्तान संघासाठी दमदार कामगिरी करताना दिसतोय. सुपर ४ फेरीत पाकिस्तानने बांगलादेशचा दारूण पराभव केला आहे. आता पाकिस्तानचा पुढील सामना येत्या १० सप्टेंबर रोजी पाकिस्तान संघाविरूद्ध रंगणार आहे.

हा सामना कोलंबोच्या मैदानावर रंगणार आहे. आशिया चषक २०२३ स्पर्धेत पाकिस्तानच्या गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे.

शाहीन आफ्रिदीच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत ७ गडी बाद केले आहेत. तर ३५ धावा खर्च करत ४ गडी बाद ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com