Steve Smith Big Bash League : स्टीव्ह स्मिथचा धुमाकूळ; अवघ्या एका चेंडूत कुटल्या १६ धावा, Video Viral

स्मिथने ३३ चेंडूमध्ये ६६ धावांची खेळी केली. या खेळीत १ चेंडूत कुटलेल्या १६ धावांची खेळी लक्षवेधी ठरली.
Steven Smith Big Bash League
Steven Smith Big Bash League Saam Tv

Steven Smith Big Bash League : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियातील आयोजित बिग बॅश लीगमध्ये तुफान फॉर्ममध्ये दिसत आहे. सोमवारी २३ जानेवारी रोजी होबार्ट हरिकेंस आणि सिडनी सिक्सर्स दरम्यान झालेल्या सामना खेळला गेला. या सामन्यात स्टिव्ह स्मिथने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. स्मिथने ३३ चेंडूमध्ये ६६ धावांची खेळी केली. या खेळीत १ चेंडूत कुटलेल्या १६ धावांची खेळी लक्षवेधी ठरली. (Latest Marathi News)

Steven Smith Big Bash League
Womens Cricket: Team India च्या पोरींचीही कमाल! ICC च्या T20 संघात मिळवले 4 खेळाडूंनी स्थान

स्टिव्ह स्मिथने (Steve Smith) षटकाच्या तिसऱ्या चेंडूमध्ये चमत्कार करून दाखवला आहे. जोएल पेरिसच्या गोंलदांजीवर स्मिथने षटकार ठोकला. त्याचबरोबर जोएलने नॉ बॉल टाकला. त्यावेळी स्मिथने सात धावा कुटल्या.

त्यानंतर जोएल पेरिसने एक चेंडू वाईड टाकल्यानंतर निसटला. त्यामुळे पाच धावा मिळाल्या. फ्रिट हिटच्या वेळी स्मिथने चौकार लगावला. षटकाच्या चौथा चेंडूवर चौकार लगावला. खरंतर स्मिथने एका षटकात २१ धावा कुटल्या.

स्टिव्हने एलिटेड स्टायकर्सच्या विरुद्ध १०१ धावांची खेळी खेळली होती. त्यानंतर सिडनी थंडर्सच्या विरुद्ध १२५ धावा कुटल्या होत्या. त्यामुळे ३३ वर्षाच्या स्मिथचा फॉर्म टीम इंडियासाठी (Team India) चिंतेचा विषय ठरू शकतो.

फेब्रवारीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध चार सामन्यांचा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे स्मिथचा फॉर्म टीम इंडियाला डोकेदुखी ठरू शकतो. स्मिथने भारताच्या विरुद्ध देखील चांगला विक्रम केला आहे. आठ शतक ठोकणाऱ्या स्मिथने तीन शकते ही भारताच्या विरुद्ध ठोकले आहेत.

जोएल पेरिस

1.1 - 0 धावा

1.2 - 0 धावा

1.3 - 7 धावा (नो बॉल + 6)

1.3 - 5 धावा (वाइड + 4)

1.4 - 4 धावा

1.5 - 1 धावा

1.6- 0 धावा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com