
IND VS AUS Ahmedabad test: इंदूरच्या मैदानावर भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार कामगिरी करत ९ गडी राखून विजय मिळवला होता.
यासह या मालिकेत २-१ ने जोरदार कमबॅक केले आहे. या सामन्यात पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथकडे संघाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर जाणून घेऊया.(Latest sports updates)
चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व कोण करणार याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मात्र पॅट कमिन्स अजूनही भारतात परतला नाहीये त्यामुळे दाट शक्यता वर्तवली जात आहे की, अंतिम कसोटी सामन्यतही स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो.
स्मिथ करणार नेतृत्व?
भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना सुरु व्हायला अवघे ४ दिवस शिल्लक राहिले आहे. मात्र वैयक्तिक कारणामुळे ऑस्ट्रेलियाला परतलेल्या पॅट कमिन्सचे अजूनही भारतात आगमन झाले नाहीये.
त्यामुळे स्टीव्ह स्मिथला पुन्हा एकदा कर्णधार म्हणून मैदानात जाण्याची संधी मिळणार आहे. २०१८ पूर्वी स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार होता. मात्र बॉल टेमंरीग प्रकरणानंतर त्याचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. २०२१ मध्ये जेव्हा पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद मिळाले त्यावेळी स्टीव्ह स्मिथला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाला मिळवून दिला विजय..
पॅट कमिन्स संघाचे नेतृत्व करत असताना ऑस्ट्रेलिया संघाने सलग २ कसोटी सामने गमावले होते. मात्र तिसऱ्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथने संघाची जबाबदारी सांभाळली आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.
त्याच्या या अप्रतिम कामगिरीनंतर त्याला पूर्णवेळ कर्णधार करण्याची मागणी जॉर धरत होती. मात्र त्याने या गोष्टीला नकार दिला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.