
IPL 2023 Fight: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ४३ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चिन्नास्वामीच्या मैदानावर झालेल्या पराभवाचा बदल घेत जोरदार विजय मिळवला होता.
मात्र विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक या सामन्यात चर्चेत राहिले होते. सुरुवातीला विराट आणि नवीन यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर विराट आणि गंभीर आमने सामने आले होते.
या वादावर आता माजी भारतीय खेळाडू सुनील गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Sunil Gavaskar Statement On Virat Kohli And Gautam Gambhir Fight)
याबाबत बोलताना सुनील गावसकर म्हणाले की, 'मी या वादाचे व्हिडिओ पाहिले. मी हा सामना लाईव्ह पाहिला नव्हता. अशा गोष्टी क्रिकेटसाठी मुळीच चांगल्या नाहीये. मॅच फीचा १०० टक्के दंड काय असतो? १०० टक्के म्हणजे किती फी असते? जर विराटला १७ कोटी रुपये मिळतात, सेमीफायनल, फायनल मिळून तो १६ सामने खेळत असेल तर केवळ गोष्ट फक्त १ कोटी रुपयांची आहे. हे खूप कमी आहे.'
तसेच ते पुढे म्हणाले की, ' गंभीरची काय स्तिथी आहे मला माहित नाही. या दोघांनी मिळवून ठरवलं पाहिजे की , अशा गोष्टी पुढे व्हायला नको. दोघांवर खूप कमी दंड ठोठावला गेला आहे. माझ्या मते तर अशी शिक्षा दिली गेली पाहिजे जे की पुढे असं काहीच व्हायला नको. अशा गोष्टी मुळीच झाल्या नाही पाहिजे, ज्यामुळे संघ आणि खेळाडू अडचणीत येतील.' (Latest sports updates)
काय होता वाद?
तर झाले असे की, हा सामना सुरु असताना विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात बाचाबाची सुरु होती. सामना सुरु असताना दोघे एकमेकांना काहीतरी बोलताना दिसून आले होते. सामना संपल्यानंतर, सर्व खेळाडू हात मिळवणी करत होते त्यावेळी देखील विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात बाचाबाची सुरु असल्याचे पाहायला मिळाले होते.
हा वाद इतका चिघळला होता की, संघातील इतर खेळाडूंना मध्यस्ती करावी लागली होती. जेव्हा विराट कोहली आणि गौतम गंभीर हे दोघे आमने सामने आले. त्यावेळी देखील वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.