
IND VS AUS Sunil Gavaskar: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी इंदूरच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी केवळ ७६ धावांची आवश्यकता होती. हे आव्हान ऑस्ट्रेलिया संघाने सहजरित्या पूर्ण केले.
दरम्यान हा सामना झाल्यानंतर आयसीसीने इंदूरच्या खेळपट्टीला डिमेरीट पॉईंट्स दिले आहे. तसेच अनेक दिग्गजांनी इंदूरची खेळपट्टी कसोटी सामन्यासाठी योग्य नसल्याचे देखील म्हटले होते. आता भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी आयसीसीला चांगलेच खडेबोल सुनावले आहे. (Latest sports updates)
सुनील गावसकरांनी इंडिया टुडेसोबत बोलताना म्हटले की,' मला एक गोष्ट जाणून घायची आहे की, ब्रिस्बेन आणि गाभा कसोटी सामना देखील दोन दिवसात संपुष्ठात आला होता. त्या खेळपट्टीला किती डिमेरीट पॉईंट्स दिले गेले होते? त्या सामन्याचे सामनाधिकारी कोण होते?'
तसेच ते म्हणाले की,' या खेळपट्टीला ३ गुण देणं कठोर निर्णय आहे. या खेळपट्टीवर चेंडू टर्न होत होता. मात्र हे घातक नव्हते. ज्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने १ विकेटच्या मोबदल्यात ७७ धावा केल्या म्हणजे ही खेळपट्टी फलंदाजीसाठी योग्य होती.'
गाबाच्या खेळपट्टीला सरासरीपेक्षाही कमी रेटिंग दिली गेली होती. या खेळपट्टीबाबत बोलताना सामनाधिकारी रिची रिचडर्सन यांनी म्हटले होते की,' ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी अधिक फायदेशीर होती. या खेळपट्टीवर चेंडू अंधाधुंद उसळी घेत होता.'
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.