मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; सूर्यकुमार यादव IPL मधून बाहेर, कारण...

मागच्या काही सामन्यात त्याच्या अनुपस्थितीमुळे मुंबई इंडियन्सला मोठा फटका बसला होता.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavSaam TV

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) दुखापतीची बातमी चाहत्यांशी शेअर केली. मुंबई इंडियन्सने निवेदन जारी करून म्हटले आहे की, सूर्यकुमार यादवच्या डाव्या हाताला ताण आला आहे. त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. बीसीसीआयच्या (BCCI) वैद्यकीय पथकाशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे पहिले दोन सामनेही खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीमुळे मुंबई इंडियन्सला मोठा फटका बसला होता.

सूर्यकुमार यादवने आयपीएल 2022 मध्ये पाऊल ठेवताच चांगली फलंदाजी केली. त्याने 8 सामन्यात 43 पेक्षा जास्त सरासरीने 303 धावा केल्या, त्यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. सूर्यकुमार यादवला दुखापतीनंतर विश्रांती देण्यात आली आहे. कारण आयपीएलनंतर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेत बड्या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते, त्यामुळे तेथे सूर्यकुमारची उपस्थिती महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान मुंबईच्या संघाचे यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहे. ५ वेळचा विजेता मुंबईचा संघ यंदाच्या हंगामात मात्र आठ सामने लगातार हारला. सध्या आयपीएलचा रणसंग्राम अतिशय रंगात आला आहे. यंदाच्या हंगामात कोणीतरी नवा विजते मिळतो हे पाहावं लागणार आहे. कारण दोन नवीन संघ यंदाच्या हंगामात खेळत आहेत आणि दोन्हीही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com