Viral Video : 'सूर्या'च्या साधेपणानं जिंकलं नेटकऱ्यांचं मन! गल्ली क्रिकेटमध्ये चाहत्यांसाठी दाखवली सुपला शॉटची झलक

भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Suryakumar yadav viral video News
Suryakumar yadav viral video News Saam tv

Suryakumar yadav News : भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सूर्यकुमार व्हिडिओत गल्ली क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना दिसत आहे. त्यात सूर्याने सुपला शॉटची झलक दाखवून चाहत्यांचं मन जिंकलं आहे. मुंबईतील गल्ली क्रिकेटमध्ये खेळलेला सुपला शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

सूर्यकुमार या व्हिडिओमध्ये फलंदाजी करताना दिसत आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मुंबईतील (Mumbai) गल्ली क्रिकेटमध्ये तरुणांच्या घोळक्यामध्ये फलंदाजी करताना दिसत आहे. त्याने त्यावेळी चाहत्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सूर्यकुमारने सुपला शॉट खेळून दाखवला. त्याचा सुपला शॉट पाहून बाजूला उभे असलेले चाहते त्याच्याकडे पाहतच राहीले. सूर्यकुमारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

सूर्यकुमार सध्या भारताच्या कसोटी संघाचा भाग नाही. नागपूरमध्ये पहिला कसोटी सामना खेळण्याची त्याला संधी मिळाली. सूर्यकुमारने कसोटी सामन्यात फारशी कमाल दाखवली नाही. त्यामुळे कसोटी संघात श्रेयस अय्यरला संधी मिळाली तर सूर्यकुमारला कसोटी संघातून बाहेर जावं लागलं आहे. त्यानंतर सूर्यकुमारला कसोटी संघात स्थान मिळालं नाही.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाचा कसोटी सामन्याचा चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबाद येथे होणार आहे. या सामन्यात सूर्यकुमारला संधी मिळणे अवघड आहे. मात्र, सूर्यकुमारला एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळू शकते. त्यानंतर आयपीएलमध्ये त्याचा फलंदाजीचा जलवा पाहायला मिळणार आहे.

Suryakumar yadav viral video News
Cricket News: मराठमोळ्या पोरीची WPLमध्ये धुवांधार खेळी! स्पॉन्सर नसल्याने बॅटवर लिहिलं धोनीचं नाव अन् कमालच केली

सूर्यकुमार हा आयपीएलमध्ये मुंबईच्या संघातून खेळतो. मुंबईच्या संघासाठी जोरदार फलंदाजी करून टीम इंडियाच्या टी-२० संघात स्थान पक्क केलं. सूर्यकुमार यादव टी-२० फॉरमॅटमधील जगातील क्रमांक एकचा खेळाडू आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com