रोहित शर्माच्या कर्णधार पदाबाबत सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

भारतीय संघाकडून (Team India) काही दिवसांपुर्वी पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) रोहित शर्माच्या कर्णधारपदाविषयी मोठे विधान केले आहे.
रोहित शर्माच्या कर्णधार पदाबाबत सूर्यकुमार यादवचे मोठे विधान
सूर्यकुमार यादवचे आणि रोहित शर्माTwitter

भारतीय संघाकडून (Team India) काही दिवसांपुर्वी पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) रोहित शर्माच्या कर्णधारपदाविषयी मोठा दावा केला आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सूर्यकुमार यादव लवकरच शिखर धवनच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. सुर्या सध्या श्रीलंका दौर्‍यावर आहे. तेथे शिखर धवन नेतृत्व करणार आहे, कारण नियमित कर्णधार विराट कोहली सध्या इंग्लंड दौर्‍यावर आहे. (Suryakumar Yadav's big statement about Rohit Sharma's captaincy)

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने हिटमन रोहितच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आहे. तो म्हणाला ''रोहितच्या कायम डोक्यात असते की कोणत्या गोलंदाजाला कधी गोलंदाजीला बोलवावं आणि कोणत्या क्षेत्ररक्षकाला कुठे उभं करावं''. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने पाच वेळा आयपीएल जिंकली आहे.

सूर्यकुमार यादवचे आणि रोहित शर्मा
IND vs SL: श्रीलंकेच्या चिंतेत वाढ; सराव न करताच खेळावा लागणार सामना

सूर्यकुमार यादव क्रिकबझशी बोलताना म्हणाला की, “कर्णधार म्हणून रोहित शर्मा कायम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात बदल करत असतो. 8 वर्षात 5 वेळा जिंकणे ही संघासाठी मोठी कामगिरी आहे. तो नेहमी स्वत: पेक्षा संघाला पुढे ठेवत असतो आणि त्याच्या याच गोष्टीमुळे प्रत्येकजण त्याची प्रशंसा करत असतो". रोहितला बर्‍याच वेळा पाहिले गेले आहे की जेव्हा मुंबईकडे चांगले सलामीवीर असतात तेव्हा तो मधल्या फळीत खेळतो आणि आवश्यकतेनुसार तोही सलामीला जातो.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com