T-20 Wolrd Cup Sqaud: IPL मधील धमाक्यामुळे 'क्रिस गेल'ला लाॅटरी

आयसीसी टी -20 विश्वचषकासाठी (ICC T-20 Wolrd Cup) वेस्ट इंडिजने (West Indies) आपला संघ जाहीर केला आहे.
T-20 Wolrd Cup Sqaud: IPL मधील धमाक्यामुळे 'क्रिस गेल'ला लाॅटरी
T-20 Wolrd Cup Sqaud: IPL मधील धमाक्यामुळे 'क्रिस गेल'ला लाॅटरीTwitter/ @ICC

आयसीसी टी -20 विश्वचषकासाठी (ICC T-20 Wolrd Cup) वेस्ट इंडिजने (West Indies) आपला संघ जाहीर केला आहे. अनुभवी फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) आणि अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो यांना विंडीज बोर्डाने 15 जणांच्या संघात स्थान दिले आहे. विंडीज बोर्डाने ट्विट करून संघाची घोषणा केली. किरॉन पोलार्ड संघाचे नेतृत्व करणार आहे. हा विश्वचषक यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान बीसीसीआय आयोजित करणार आहे. (West Indies Squad For T-20 World Cup)

टी -20 विश्वचषकाचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजने अनुभवी खेळाडूंचा संघात भरणा केला आहे. जगातील सर्वात स्फोटक सलामीवीर मानल्या जाणाऱ्या ख्रिस गेलला या संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर 2013 नंतर प्रथमच आयसीसी स्पर्धेत प्रवेश करणाऱ्या किरॉन पोलार्डला संघाचा कर्णधार नेमण्यात आले आहे. ड्वेन ब्राव्हो, लेंडल सिमन्स पूर्वीपासूनच टी -20 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असणार आहेत. असे मानले जाते की ही स्पर्धा यापैकी अनेक खेळाडूंसाठी शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असू शकते.

T-20 Wolrd Cup Sqaud: IPL मधील धमाक्यामुळे 'क्रिस गेल'ला लाॅटरी
IPL 2021: ''भारतीय संघातील 1 कोरोना पॉझिटिव्ह केस IPL धोक्यात आणेल''

वेस्ट इंडिज संघाला गट 1 मध्ये स्थान देण्यात आले आहे. या गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांना स्थान देण्यात आले आहे. याशिवाय, दोन क्वालिफायर संघ देखील या गटाचा भाग असतील. वेस्ट इंडीज संघ 23 ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे. वेस्ट इंडीज संघ सध्या स्पर्धेचा विजेता आहे. 2016 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा रोमहर्षक सामन्यात पराभव करून वेस्ट इंडिजने दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले होते.

वेस्ट इंडीज संघ

लेंडल सिमन्स, एविन लुईस, ख्रिस गेल, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन (यष्टिरक्षक), किरॉन पोलार्ड (कर्णधार), आंद्रे रसेल, जेसन होल्डर, ड्वेन ब्राव्हो, हेडन वॉल, अकिल हुसैन, फॅबियन एलन, शेल्डन कॉटरेल, आंद्रे फ्लेचर, केविन सिंक्लेअर.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com