VIDEO: अख्ख्या टी20 वर्ल्ड कपचं समीकरण बदलणारी कॅच; पाकिस्तानला लॉटरी, तर दक्षिण आफ्रिका 'फ्लाईट' मोडवर

मिलर बाद होताच दक्षिण आफ्रिकेचा डाव घसरला. शेवटी नेदरलँड्सने हा सामना 13 धावांनी जिंकला.
T20 Catch
T20 Catchsaam tv

T20 world cup : टी-20 वर्ल्ड कपच्या ग्रुप-बीच्या दक्षिण आफ्रिका-नेदरलँड मॅचमध्ये एक चमत्कारिक बदल पाहायला मिळाला. नेदरलँडच्या विजयाने दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा चोकर्स ठरली आहे. नेदरलँडला नमवून दक्षिण आफ्रिका आपलं सेमीफायनलचं तिकीट पक्क करेल असं सर्वांनाच वाटत होतं. मात्र परंपरा कायम राखत दक्षिण आफ्रिकेचं पुन्हा एकदा वर्ल्ड कपमधून आश्चर्यकारक पॅकअप झालं. या मॅचचा टर्निंग पॉईंट डेव्हिड मिलरची कॅच होती.

दक्षिण आफ्रिकेचा टी-20 वर्ल्ड कपचा प्रवास रविवारी संपुष्टात आला. नेदरलँड्सने ग्रुप बीच्या सामन्यात आफ्रिकेचा 13 धावांनी पराभव करून सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर काढले. विशेष बाब म्हणजे आफ्रिकेला बाहेर काढण्यात सर्वात मोठा हात याच देशात जन्माला आला आणि नेदरलँडकडून खेळणारा 37 वर्षीय अष्टपैलू रॉल्फ व्हॅन डर मर्व्हेचा हात होता. (Sports News)

T20 Catch
India Vs England T20 Semi Final: सेमीफायनल मध्ये भारत-इंग्लंड भिडणार, जाणून घ्या संपूर्ण शेड्युल

मर्व्हने निर्णायक क्षणी डेव्हिड मिलरचा जादुई कॅच घेतला. मोठी खेळी अपेक्षित असताना रॉल्फने डेव्हिड मिलरला कॅच आऊट केलं. आफ्रिकेचा संघ 4 विकेट्स गमावून 19 धावांवर होता. संघाला विजयापर्यंत नेण्याची जबाबदारी मिलरवर होती. मिलरने अशाच परिस्थितीत भारताविरुद्धचा सामना जिंकला होता.

नेदरलँड्सविरुद्ध मिलर बाद झाला तेव्हा संघाला विजयासाठी 5 ओव्हरमध्ये 48 धावांची गरज होती. अशा परिस्थितीत मिलरने क्रीझवर थांबणे गरजेचं होतं. तसं झालं असतं तर आफ्रिकन संघाला 159 धावांचे लक्ष्य गाठता आले असते. त्याचवेळी रॉल्फने मिलरचा कॅच घेत खेळ उलटवला.

आफ्रिकेच्या डावातील 16व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मिलरने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या बाजूला लागला आणि हवेत गेला. उलट दिशेने धावत रॉल्फ व्हॅन डर मर्व्हेने तो कॅच घेतला. मिलर बाद होताच दक्षिण आफ्रिकेचा डाव घसरला. शेवटी नेदरलँड्सने हा सामना 13 धावांनी जिंकला.

T20 Catch
Suryakumar Yadav: यंदा 'सूर्या' तळपला, टी20 क्रिकेट मध्ये 1000 धावांचा झंझावात, सुर्यकूमारनं इतिहास रचला

रॉल्फ व्हॅन डर मर्व्हे यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला. त्याने 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आफ्रिकेसाठी 13 एकदिवसीय आणि तितके टी-20 सामने खेळले. 2015 मध्ये त्याला डच पासपोर्ट मिळाला. त्याच वर्षी त्याने नेदरलँडकडून पदार्पणही केले. त्याने नेदरलँडसाठी 36 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com