World Cup: भारतीय संघाची निवड, दिग्गजांना डच्चू; जाणून घ्या संपूर्ण संघ

टी-20 विश्वचषकासाठी (T-20 Wolrd Cup) भारतीय संघाची निवड झाली आहे. यामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
World Cup: भारतीय संघाची निवड, दिग्गजांना डच्चू; जाणून घ्या संपूर्ण संघ
World Cup: भारतीय संघाची निवड, दिग्गजांना डच्चू; जाणून घ्या संपूर्ण संघTwitter/ @BCCI

टी-20 विश्वचषकासाठी (T-20 Wolrd Cup) भारतीय संघाची निवड झाली आहे. यामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यंदाचा विश्वचषक युएई आणि ओमानमध्ये होणार आहे. भारतीय संघाची निवड हा चर्चेचा विषय ठरला होता. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) फलंदाज सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संघात स्थान देण्यात आली आहे. त्याचबरोबर शिखर धवनला संघातून डच्चू मिळाला आहे. त्याचबरोबर श्रेयश अय्यर डच्चू देण्यात आला आहे. महेंद्रसिंग धोनीला भारतीय संघाचा सल्लागार म्हणून नेमण्यात आले आहे.

भारतीय संघ

रोहित शर्मा, केएल राहूल, विराट कोहली (कर्णधार), सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहूल चहर, रविचंद्रन आश्विन, अक्सर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रित बुमराह, महम्मद शमी, भुवनेश्वर कुमार.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com