T20 World Cup 2021 टीम इंडियाची घोषणा; धोनीला मिळाली नवीन जबाबदारी

टी-20 विश्वचषकासाठी गेल्या अनके दिवसांपासून वाट पाहणाऱ्या क्रीडाप्रेमींसाठी अखेर आज टीम इंडियातील शिलेदारांची माहिती समजली आहे.
T20 World Cup 2021 टीम इंडियाची घोषणा; धोनीला मिळाली नवीन जबाबदारी
T20 World Cup 2021 टीम इंडियाची घोषणा; धोनीला मिळाली नवीन जबाबदारीSaamTv

T20 World Cup 2021 : टी-20 विश्वचषकासाठी गेल्या अनके दिवसांपासून वाट पाहणाऱ्या क्रीडारसिकांसाठी अखेर आज टीम इंडियातील शिलेदारांची माहिती समजली आहे. BCCI च्या निवड समितीने प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेऊन टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ घोषित केला आहे.

या टी-20 विश्वचषकासाठी संघात काही नावे अपेक्षित होती, तर काही खेळाडूंची नावे वगळण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे या संघात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचेही नाव घोषित करण्यात आले असून माही एका नव्या जबाबदारीसह संघासोबत असणार आहे. BCCIचे सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली आहे.

असा असेल भारतीय संघ

रोहित शर्मा, केएल राहूल, विराट कोहली (कर्णधार), सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहूल चहर, रविचंद्रन आश्विन, अक्सर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रित बुमराह, महम्मद शमी, भुवनेश्वर कुमार.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com