IRAvsWI
IRAvsWISAAM TV

T20 World Cup: आयर्लंडचा वेस्ट इंडीजला 'दे धक्का', दोनदा वर्ल्ड चॅम्पियन संघ पहिल्याच फेरीत बाहेर

ग्रुप बीमध्ये आयर्लंडने वेस्ट इंडिजचा 9 विकेट्सने पराभव करत सुपर-12 मध्ये आपले स्थान निश्चित केले.

T20 World Cup: टी 20 विश्वचषकाचा 11 व्या सामन्यात वेस्ट इंडिजला जोरदार झटका बसला आहे. दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या टीमवर पहिल्याच फेरीत बाहेर होण्याची नामुष्की ओढावली आहे. आयर्लंडच्या तुफानी खेळीच्या जोरावर हे शक्य झालं आहे. ग्रुप बीमध्ये आयर्लंडने वेस्ट इंडिजचा 9 विकेट्सने पराभव करत सुपर-12 मध्ये आपले स्थान निश्चित केले.

वेस्ट इंडिजचा पराभव करून आयर्लंडने स्पर्धेतून बाद फेरीत प्रवेश केला आहे. आयर्लंडने हा सामना नऊ विकेट्सने जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 5 बाद 146 धावा केल्या. प्रत्युत्तरात आयर्लंडच्या संघाने 17.3 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 150 धावा करून सामना जिंकला. (Sports News)

IRAvsWI
IND VS PAK: भारताच्या 'या' पाच चुका ठरू शकतात पराभवाचं कारण, पाकिस्तान विरुद्ध जिंकण्यासाठी काय केलं पाहिजे?

आयर्लंडकडून स्फोटक फलंदाज पॉल स्टर्लिंगने 48 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या. लॉर्कन टकर 35 चेंडूत 45 धावा करून नाबाद राहिला. कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने 23 चेंडूत 37 धावा केल्या. आयर्लंडच्या विजयाचा खरा हिरो होता फिरकी गोलंदाज गॅरेथ डेन्ली ठरला. त्याने चार षटकात 16 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. त्याने एविन लुईस, निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल यांना बाद केले होते.

IRAvsWI
पाकिस्तानच्या 'त्या' धमकीनंतर मोदी सरकारच्या मंत्र्यांनी ठणकावलं, म्हणाले, भारत पॉवरहाउस...

आयसीसी क्रमवारीत आयर्लंड 12व्या स्थानावर आहे. तर वेस्ट इंडिजचा संघ सातव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज हा क्रमवारीतील टॉप-10 देशांमधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. आयर्लंडचे तीन सामन्यांत चार गुण आहेत. तर वेस्ट इंडिजचे तीन सामन्यांत केवळ दोन गुण होते. सुपर-12 मध्ये आयर्लंडचा संघ कोणत्या गटात जाणार, हे स्कॉटलंड आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्याच्या निकालानंतर ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com