T20 World Cup Points Table: ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपमधून बाहेर जाणार? सर्व संघांची माहिती वाचा सविस्तर

टी 20 वर्ल्डकप 2022 च्या गुणतालिकेची माहिती वाचा सविस्तर
T20 world cup 2022
T20 world cup 2022saam tv

मुंबई : ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्डकपचा थरार सुरु झाला असून गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचण्यासाठी सर्वच संघांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. सुपर 12 राउंडमध्ये आतापर्यंत एकूण 14 सामने खेळवले गेले आहेत. अजूनही खूप सामने खेळवले जाणार आहेत. ऑस्ट्रेलियात वर्ल्डकपचे (T20 World Cup) रोमहर्षक सामने होत आहेत, परंतु, दुसरीकडे पावसानं कहर केला आहे. एका पाठोपाठ एक सामने पावसाच्या संकटामुळं रद्द होताना दिसत आहेत.

आज अंत्यंत महत्वाचा ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंडचा सामन्यातही पावसाने खोडा घातला. मेलबर्नच्या मैदानात एकही चेंडू न फेकता पावसामुळं हा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे गतविजेत्या आणि यजमान ऑस्ट्रेलिया संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. (T20 world cup 2022 points table latest update)

T20 world cup 2022
Viral Video : झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर केला अफलातून डान्स; व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल

आज शुक्रवारी वर्ल्डकपचे दोन सामने खेळवले जाणार होते. दोन्ही सामने मेलबर्नच्या मैदानात होणार होते. याच मैदानात भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याचा थरार रंगला होता. या सामन्यात पावसानं व्यत्यय आणला नाही. पण त्यानंतर पावसामुळं मेलबर्नच्या मैदानात सामन्यांची रखडपट्टी सुरु झाली आहे. आज होणारे दोन्ही सामने ग्रुप एक मधील होते. यामध्ये पहिला सामना आर्यलॅंड आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार होता. तर दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात रंगणार होता. पावसामुळं दोन्ही सामने रद्द झाले आणि या संघांना 1-1 गुण मिळाले.

T20 world cup 2022
T20 world cup 2022google

ऑस्ट्रेलिया संघ बाहेर होणार?

पावसामुळं हे दोन्ही सामने रद्द झाल्यामुळं ग्रुप एकची स्थिती बिकट झाली आहे. या ग्रुपमध्ये सर्व संघांचं खातं उघडलं आहे. न्यूझीलंड दोन सामन्यानंतर 3 गुण मिळवून पहिल्या स्थानावर आहे. तसंच आजच्या परिस्थितीनंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडेही 3-3 गुण आहेत. तर आर्यलॅंडच्या खात्यातही 3 गुण आहेत. या तिनही संघांनी 3-3 सामने खेळले आहेत. मात्र, या तिघांमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाचं सर्वात जास्त नुकसान झालं आहे. नेट रनरेट मध्ये ऑस्ट्रेलिया या ग्रुपच्या सर्व संघांच्या मागे आहे. त्यांचं NRR-1.555 आहे. तर आर्यलॅंडचा थोडा चांगला -1.169 आहे. तसंच इंग्लंड 0.239 सोबत चांगल्या स्थितीत आहे.

T20 world cup 2022
T20 World Cup: पाकिस्तानच्या पराभवानंतर मिस्टर बीन का होतोय ट्रेंड? झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतींनीही केलं ट्वीट
T20 world Cup points table
T20 world Cup points tablegoogle

सुपर 12 मध्ये ग्रुप-1 ची स्थिती

अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा जर आगामी होणाऱ्या सामन्यांमध्ये पराभव झाला किंवा पावसामुळं सामना रद्द झाला तर, वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रवास संपू शकतो. मात्र, या निर्णयामुळं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला एक-एक संधी दिली आहे. कारण आजच्या सामन्याचा निर्णय एका संघाला बाहेरचा रस्ता दाखवू शकला असता. अशातच उर्वरित सामन्यांमध्ये जिंकण्याची दोन्ही संघांना आशा आहे. जेणेकरून सेमिफायनलचे दरवाजे खुले होतील.

टीम इंडिया नंबर वन

गुणतालिकेत ग्रुप-2 मध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे. टीम इंडियानं आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. दोन्ही सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. त्यामुळे चार गुण मिळवून भारत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका आहे. तर पाकिस्तान आणि नेदरलॅंडला आतापर्यंत खातंही उघडता आलं नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com