T20 World Cup: वर्ल्ड कप विजेत्या संघाला किती बक्षीस मिळणार; टीम इंडियाही होणार मालामाल

अंतिम फेरीत पराभूत होणारा संघाला 800,000 डॉलर म्हणजे सुमारे 6.52 कोटी रुपये मिळतील.
ICC Trophy
ICC TrophySaam TV

T20 World Cup Final: T20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सुरु आहे. हा सामना जिंकून विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला 16 लाख डॉलर भारतीय रुपयांमध्ये सुमारे 13.05 कोटी रुपये मिळतील. अंतिम फेरीत पराभूत होणारा संघाला 800,000 डॉलर म्हणजे सुमारे 6.52 कोटी रुपये मिळतील. याशिवाय स्पर्धेत चांगली कामगिरी करणारे खेळाडूही मालामाल होणार आहेत.

T20 विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण बक्षीस रक्कम 56 लाख डॉलर म्हणजेसुमारे 45.68 कोटी रुपये आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना ठराविक रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. पहिल्या फेरीत बाहेर पडलेल्या संघांना 40,000 डॉलर म्हमजे सुमारे 32.63 लाख रुपये दिले जातील. नामिबिया, यूएई, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंडच्या संघांना प्रत्येकी 40,000 रुपये दिले जातील. (Sports News)

ICC Trophy
PAK vs ENG T20 World Cup 2022 Final: आजचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास विजेता कसा ठरवणार? ICC चा प्लान बी काय?

उपांत्य फेरीत पराभूत संघांना 3.6 कोटी मिळतील

उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या भारत आणि न्यूझीलंडला 400,000 डॉलर म्हणजे सुमारे 3.6 कोटी रुपये दिले जातील. तर अंतिम फेरीत पोहोचलेल्या पाकिस्तान आणि इंग्लंडच्या संघांनी किमान 800,000 डॉलर्सचे बक्षीस निश्चित केले आहे.

भारताला 4.56 कोटी रुपये मिळतील

या विश्वचषकात भारतीय संघाला सुमारे 4.56 कोटी रुपये मिळणार आहेत. टीम इंडियाने या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. यासाठी भारताला 3.6 कोटी रुपये मिळतील. तसेच, भारताने सुपर-12 फेरीत चार सामने जिंकले आणि प्रत्येक सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला सुमारे 32.62 लाख रुपये दिले जातील. यानुसार भारताला सुमारे 4.56 कोटी रुपये मिळतील.

ICC Trophy
T-20 Word Cup: टीम इंडियाच्या जखमेवर पाकच्या पंतप्रधानांनी मीठ चोळलं; इरफान पठाणने भरली सणसणीत मिर्ची

सुपर-12 मध्ये बाहेर पडलेल्या संघांना 57 लाख

सुपर-12 टप्प्यातून बाहेर पडलेल्या आठ संघांना 70,000 डॉलर म्हणजे सुमारे 57.08 लाख रुपये मिळतील. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, आयर्लंड आणि श्रीलंका हे संघ सुपर-12 टप्प्यातील पहिल्या गटातून बाहेर पडले. तर दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, नेदरलँड आणि झिम्बाब्वे हे संघ दुसऱ्या गटातून बाहेर पडले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com