T20 World Cup Final: इंग्लिश बॉलर्स समोर पाकिस्तानचं लोटांगण, इंग्लंडसमोर १३८ धावांचं लक्ष्य

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 8 गडी गमावून 137 धावा केल्या.
England
EnglandSaam TV

T20 World Cup Final: T20 विश्वचषक अंतिम सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडसमोर 138 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 8 गडी गमावून 137 धावा केल्या.

पाकिस्तानची फलंदाजी फ्लॉप ठरली. सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. शान मसूदने सर्वाधिक 38 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार बाबरने 32 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून सॅम करनने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. (Sports News)

England
सात सीनिअर खेळाडू टीम इंडियात असतील तर...; जडेजाने काढला रोहित शर्मावर राग

दोन्ही संघांनी प्रत्येकी एकदा विश्वचषक जिंकला आहे. 2009 मध्ये पाकिस्तान आणि 2010 मध्ये इंग्लंड T20 चॅम्पियन बनले होते. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

England
T20 World Cup Final: पाकिस्तान-इंग्लंड अंतिम सामन्यासाठी नियमांमध्ये मोठा बदल, काय फरक पडणार?

सामन्यादरम्यान पाऊस पडल्यास काय?

मेलबर्नमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. पाऊस पडल्यास अंतिम सामना सोमवारी 'रिझर्व्ह डे'ला खेळवला जाईल. आयसीसीने उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसाची व्यवस्था केली आहे. दुसरीकडे, राखीव दिवशीही पावसाने व्यत्यय आणला, तर सामन्याच्या निकालासाठी किमान 10-10 षटकांचा खेळ होणे आवश्यक आहे. म्हणजेच दोन्ही दिवशी पाऊस पडल्यास पाकिस्तान आणि इंग्लंड संघ 10-10 षटके खेळले तरच सामन्याचा निर्णय डकवर्थ लुईस नियमानुसार होईल.

पावसामुळे अंतिम सामना न झाल्यास नियमानुसार दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. T20 आणि एकदिवसीय विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंतच्या इतिहासात कधीही संयुक्त विजेता झालेला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com