T-20 विश्वचषकानंतर टीम इंडियात खळबळ; विराट कोहली कर्णधारपद सोडणार?

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी- 20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहली कॅप्टनसी सोडण्याची शक्यता
T-20 विश्वचषकानंतर टीम इंडियात खळबळ; विराट कोहली कर्णधारपद सोडणार?
T-20 विश्वचषकानंतर टीम इंडियात खळबळ; विराट कोहली कर्णधारपद सोडणार?Saam Tv

मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी- 20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहली Virat Kohli कॅप्टनसी सोडण्याची शक्यता आहे. विराट वन- डे आणि टी- 20 टीमची कॅप्टनसी सोडणार आहे. त्याच्या जागी रोहित शर्माकडे टीमचे नेतृत्त्व दिले जाऊ शकणार आहे. विराट बॅटींगवर मोठ्या प्रमाणात फोकस करण्याकरिता हा निर्णय घेऊ शकणार आहे.

हे देखील पहा-

विराट कोहली आणि टीम मॅनेजमेंट यांच्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाले आहे, असे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या दरम्यानच्या काळात यूएई आणि ओमानमध्ये टी- 20 वर्ल्ड कप होणार आहे. या विषयावर मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली स्वत: हा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

T-20 विश्वचषकानंतर टीम इंडियात खळबळ; विराट कोहली कर्णधारपद सोडणार?
Accident; जीपची ट्रकला धडक, आठ जणांचा जागीच मृत्यू

जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन होण्याकरिता विराटला परत एकदा त्याच्या बॅटींगवर अधिक फोकस करण्याची इच्छा राहणार आहे. रोहित शर्माच्या कॅप्टनसीमध्ये मुंबई इंडियन्सने ५ वेळा आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. तर दुसरीकडे विराटच्या कॅप्टनसी मध्ये टीम इंडियाला आतापर्यंत एकदाही आयसीसीचे स्पर्धेत विजेतेपद मिळाले नाही. तसेच आयपीएल स्पर्धाही विराटला आजवर जिंकता आले नाही.

येणाऱ्या काळात आयसीसीच्या 3 वर्ल्ड कप स्पर्धा सलग तीन वर्ष होणार आहेत. येत्या महिन्यात यूएई आणि ओमानमध्ये टी वर्ल्ड कप होणार आहे. यानंतर पुढच्या वर्षी परत ऑस्ट्रेलियात एक टी- 20 वर्ल्ड कप T20 World Cup 2022 मध्ये होईल. यानंतर 2023 साली भारतामध्ये वन- डे वर्ल्ड कप होणार आहे. या स्पर्धांकरिता टीमची बांधणी करण्यासाठी रोहितला वेळ मिळावा याकरिता त्याला लवकरात लवकर कॅप्टन करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com