ICC's 'Team of Tournament' : भारतीयांची निराशा; आझम 'कर्णधार'

निवड मुख्यतः सुपर १२ नंतर अंतिम फेरीवर आधारित होती असे ज्युरी सदस्यांपैकी एकाने नमूद केले.
ICC's 'Team of Tournament' : भारतीयांची निराशा; आझम 'कर्णधार'
virat kohli azam babar

दुबई: श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेसह सहा वेगवेगळ्या देशांच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या आयसीसीच्या T- 20 विश्वकरंडक 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये एकाही भारतीय क्रिकेटपटूचा संघात समावेश झालेला नाही. पाकिस्तानचा बाबर आझमची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्धचे सामने जिंकण्यापुर्वीच पाकिस्तान आणि न्यूझीलंडने भारतीय संघास गट साखळी फेरीत हरवून स्पर्धेतून बाहेर काढले हाेते. no indian included in ICC's 'team of tournament babar azam captain

virat kohli azam babar
'राजमातांनी बाबासाहेबांना शिवशाहीर पदवी बहाल केली हाेती'

ज्युरी सदस्यांना आयसीसीच्या T- 20 विश्वकरंडक 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये भारतीय क्रिकेटपूटंपैकी एक ही निवडण्यास योग्य वाटला नाही. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम आणि एनरिक नॉर्टजे, श्रीलंकेचा चरिथ असालंका आणि वानिंदू हसरंगा हे असे खेळाडू आहेत ज्यांचे संघ उपांत्य फेरीतही पात्र ठरले नाहीत परंतु आयसीसीने त्यांच्या नावाचा समावेश केला आहे. विजेत्या ऑस्ट्रेलिया, उपविजेत्या न्यूझीलंड, उपांत्य फेरीतील इंग्लंड आणि पाकिस्तानच्या स्टार खेळाडूंनी आयसीसीच्या यादीत स्थान पटकाविले आहे.

सलामीवीर आणि 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' डेव्हिड वॉर्नर, लेग-स्पिनर अॅडम झाम्पा आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड या तिघांनी ऑस्ट्रेलिया संघास त्यांच्या पहिल्या T20 विश्वकरंडकावर नाव काेरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांना आयसीसीने यादीत स्थान दिले आहे. यष्टिरक्षक म्हणून इंग्लंडचा जोस बटलर आणि न्यूझीलंडचा डावखुरा ट्रेंट बोल्ट याशिवाय पाकिस्तानच्या आझम बाबरकडे नेतृत्व आणि श्रीलंकेचा हसरंगा यांना स्थान मिळाले आहे.

असा आहे संघ

डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)

जोस बटलर (wk) (इंग्लंड)

बाबर आझम (कर्णधार, पाकिस्तान)

चारिथ असलंका (श्रीलंका)

एडन मार्कराम (दक्षिण आफ्रिका)

मोईन अली (इंग्लंड)

वानिंदू हसरंगा (श्रीलंका)

अॅडम झाम्पा (ऑस्ट्रेलिया)

जोश हेझलवूड (ऑस्ट्रेलिया)

ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड)

एनरिक नॉर्टजे (दक्षिण आफ्रिका)

१२ वा: शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान)

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com