CWG: संघातून वगळल्याने न्यायालयात धाव घेतलेली दिया चितळे करणार देशाचे प्रतिनिधित्व

दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारा मानुष शाह मात्र राखीव खेळाडू आहे. पुरुष संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
table tennis player diya chitale
table tennis player diya chitalesaam tv

नवी दिल्ली (diya chitale latest news) : राष्ट्रकुल स्पर्धेसाठी (Commonwealth Games) महिलांच्या संघातून वगळल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयात (delhi high court) धाव घेतलेल्या भारताच्या युवा टेबल टेनिसपटू (table tennis) दिया चितळे (diya chitale) हिचा आज (मंगळवार) भारतीय टेल टेनिस संघात समावेश झाला आहे. या संघातून अर्चना कामतला वगळण्यात आले आहे. (Table Tennis Player Diya Chitale included in women's CWG squad)

टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) ही संस्था सध्या निलंबित आहे. त्यावरील प्रशासकांच्या समितीने गेल्या आठवड्यात महिला संघाची घोषणा केली होती. त्यामध्ये मनिका बत्रा (Manika Batra), कामत, श्रीजा अकुला (Sreeja Akula) आणि रीथ ऋष्या (Reeth Rishya) यांचा समावेश करण्यात आला होता. तसेच दिया चितळे हिला राखीव ठेवण्यात आले हाेते.

table tennis player diya chitale
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पदार्पणातच द्विशतक ठाेकणारा सुवेद पारकर ठरला मुंबईचा दुसरा फलंदाज

दरम्यान हा संघ भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या (SAI) मंजुरीच्या अधीन होता परंतु सोमवारी क्रीडा मंत्रालयाने संघ निवड ही राष्ट्रीय क्रीडा महासंघाची जबाबदारी असल्याचे सांगून प्रशासकांच्या समितीच्या कोर्टात निर्णयाचा चेंडू फेकला. एस. डी. मुदगील यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने सोमवारी पुन्हा एकदा साईच्या प्रतिसादानंतर संघाच्या अंतिम निवडीसाठी बैठक घेतली. कामत हिला वगळण्यात आले. कामत ही मनिकासोबत दुहेरीत खेळणार हाेती. तसेच समितीने स्वस्तिका घोषला राखीव ठेवले.

table tennis player diya chitale
Norway Chess 2022 : विश्वनाथन आनंदची जगजेत्या मॅग्नस कार्लसनवर मात

दरम्यान (sports) समितीने अर्चना कामतला वगळण्यात आल्याने तिचा जागा दिया चितळेने घेतली आहे. दिया मनिकासोबत दुहेरीत खेळेल असे मुदगील यांनी पीटीआयशी बाेलताना नमूद केले. या समितीने माजी खेळाडू एस रमण आणि अनिंदिता चक्रवर्ती यांना बर्मिंगहॅममधील स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला संघांचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

असा आहे निवडलेला संघ

पुरुष: शरथ कमल, जी साथियान, हरमीत देसाई, सनील शेट्टी. मानुष शाह (राखीव)

महिला: मनिका बत्रा, दिया चितळे, रीथ रिश्या, श्रीजा अकुला. स्वस्तिका घोष (राखीव).

Edited By : Siddharth Latkar

table tennis player diya chitale
बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?; जाणून घ्या स्टेप्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com