
IPL Final Match Best Moments 2023: चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा ५ विकेट्सने पराभव करून आयपीएल २०२३चे विजेतेपद पटकावले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सोमवारी खेळला गेलेला पावसामुळे प्रभावित झालेल्या विजेतेपदाचा सामना अतिशय रोमांचक झाला. चेन्नईला विजयासाठी शेवटच्या दोन धावांवर १० धावांची गरज होती आणि सर जडेजा क्रीजवर होते.
दुसरीकडे, पॅव्हेलियनमध्ये बसलेला कर्णधार एम.एस. धोनी डोळे मिटून विजयासाठी प्रार्थना करत होता. जडेजाने चेंडूवर चौकार मारून चेन्नईला पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. या शॉटनंतर मैदानावर एकच जल्लोश पाहायला मिळाला. या जबरदस्त विजयानंतर रविंद्र जडेजाची पत्नी मैदानावर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले...
चेन्नईला (Chennai Super Kings) 2 चेंडूत 10 धावांची गरज असताना मोहित शर्मासारख्या कसलेल्या गोलंदाजाला एक षटकार आणि एक चौकार मारत चेन्नईला त्यांचे पाचवे विजेतेपद जिंकून दिले. तर दुसरीकडे पत्नी रिवाबाच्या डोळ्यात पाणी आले. मैदानात थेट धाव घेत जेडजाला मिठी मारली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
जडेजाने मोहित शर्माच्या चेंडूवर चौकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला. चेन्नईच्या विजयानंतर जडेजा मैदानातून डगआऊटमध्ये बसलेल्या महेंद्र सिंह धोनीकडे धावला. त्याने धोनीला मिठी मारली. त्यावेळी धोनीने त्याला उचलले. यानंतर जडेजाची पत्नी रिवाबा मैदानात उतरली. रिवाबाने जडेजाला मिठी मारली. नेटकऱ्यांनीही हा सर्वात सुंदर क्षण असल्याचे सांगत कौतुक केले आहे.. (Latest Marathi News)
रविंद्र जडेजाच्या या दमदार खेळीनंतर सीएसके आता आयपीएल इतिहासात पाच वेळा चॅम्पियन ठरणारा दुसरा संघ ठरला आहे. गुजरात टायटन्सला सलग दुसऱ्या आयपीएल हंगामात विजेतेपद आपल्याकडे राखता आले नाही. दरम्यान, रविंद्र जडेजाची पत्नी सध्या आमदार आहे. गेल्या वर्षी गुजरात विधानसभा निवडणुकीत जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत त्यांनी विजय मिळवला होता..
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.