Team India : टीम इंडियाच्या स्टार गोलंदाजाला दुखापत, मोठ्या स्पर्धेतून झाला बाहेर

भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंना अलीकडेच दुखापतींनी ग्रासलं होतं.
umesh yadav
umesh yadavsaam Tv

मुंबई: भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंना अलीकडेच दुखापतींनी ग्रासलं होतं. त्यातील काही खेळाडू यातून बरे झाले असून, संघात (Indian Cricket Team) पुनरागमन केलं आहे. आता टीम इंडियाचा स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे. जलदगती गोलंदाज उमेश यादवला (Umesh Yadav) दुखापत झाली असून, काउंटी चॅम्पियनशिपच्या चालू मोसमात तो सहभागी होऊ शकणार नाही. उमेश यादवबाबत क्लब मिडिलसेक्सकडून ट्विट करून माहिती देण्यात आली. (Indian cricket team latest news update)

umesh yadav
T20 World Cup : पाकिस्तानच्या संघाची घोषणा; खतरनाक फलंदाज बाहेर

'आम्हाला घोषणा करताना दुःख होतंय की, उमेश यादव या मोसमातील अखेरच्या दोन सामन्यांमध्ये संघात सहभागी होऊ शकणार नाही. तो दुखापतीतून सावरत आहे,' असं ट्विट मिडिलसेक्स क्लबकडून करण्यात आलं आहे. तू लवकर बरा हो, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. उमेश यादव दुखापतग्रस्त असल्याने भारतात परतला आहे. सध्या तो रिहॅबमध्ये आहे. उमेश यादवच्या दुखापतीवर बीसीसीआयची वैद्यकीय टीम लक्ष ठेवून आहे.

रॉयल लंडन कपमध्ये ग्लुस्टरशायरविरुद्ध मिडिलसेक्स यांच्यातील अखेरच्या सामन्यात खेळताना उमेश यादवला दुखापत झाली. त्यानंतर त्याला मैदानातून बाहेर जावे लागले. उमेश यादव पुढच्या आठवड्यात लिसेस्टर दौऱ्यावर जाण्याआधी १७ सप्टेंबरला लंडनला जाणार होता. मात्र, दुखापतीमुळे त्याला उर्वरित सामन्यांसाठी यूकेला जाता येणार नाही.

दुखापतीतून टीम इंडिया सावरणार कधी?

भारतीय संघातील खेळाडूंना दुखापतींनी ग्रासलं आहे. टीम इंडियासमोरचं हे मोठं आव्हान आहे. रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल यांसारखे प्रमुख गोलंदाज दुखापतींमुळे अलीकडेच झालेल्या आशिया कपमध्ये खेळू शकले नव्हते. दिलासादायक बाब म्हणजे बुमराह आणि हर्षल हे दुखापतीतून सावरले आहेत. आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी त्यांना संघात स्थान देण्यात आले आहे. जडेजा अजून काही महिने मैदानात खेळू शकणार नाही. याशिवाय प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर हे देखील दुखापतग्रस्त आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com