IND vs BAN, Playing XI : टीम इंडियात होणार मोठे बदल! बांगलादेशला आव्हान देण्यासाठी या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात

India vs Bangladesh Playing 11 And Match Prediction: या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
IND vs BAN, Playing XI
IND vs BAN, Playing XI Saam tv news

India vs Bangladesh Playing 11 And Match Prediction:

आशिया चषकातील सुपर ४ फेरीतील शेवटचा टप्पा सुरू आहे. शेवटच्या सामन्यात भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना देखील कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे.

आतापर्यंत भारतीय संघाने सुपर ४ फेरीतील दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून भारतीय संघ विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

IND vs BAN, Playing XI
IND vs BAN: Asia Cup 2023 : टीम इंडियासाठी गुड न्यूज; श्रेयस अय्यर कमबॅकसाठी सज्ज! प्लेइंग ११ मधून कोण जाणार बाहेर?

भारतीय संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर २२८ धावांनी विजय मिळवला होता. तर श्रीलंकेला ४१ धावांनी धूळ चारत भारतीय संघाने स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. दरम्यान बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात बदल पाहायला मिळू शकतो.

भारतीय संघाला येत्या २ दिवसात अंतिम सामना खेळायचा आहे. तर भारतीय संघ सलग ३ दिवस सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.

त्यामुळे वर्कलोड मॅनेज करण्यासाठी काही खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मासारख्या खेळाडूंना प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. (Latest sports updates)

श्रेयस अय्यर खेळणार का?

भारतीय संघासाठी आनंदाची बातमी म्हणजे संघातील मध्यक्रमातील फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरला आहे. सामन्याच्या एक दिवसापूर्वी तो सराव करण्यासाठी मैदानात उतरला होता.

त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, तो बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात कमबॅक करू शकतो. गेले काही महिने संघाबाहेर राहिल्यानंतर त्याने साखळी फेरीत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कमबॅक केलं होतं. मात्र पुन्हा एकदा पाठीच्या वेदना जाणवू लागल्याने त्याला बाकावर बसावं लागलं.

IND vs BAN, Playing XI
Yuzvendra Chahal Bowling: चहलचा शेन वॉर्न अवतार! बॉल ऑफ द सेंच्युरीपेक्षा जास्त फिरवला चेंडू; VIDEO पाहायलाच हवा

गोलंदाजीत होणार बदल..

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूरला संघाबाहेर करून अक्षर पटेलला संघात स्थान दिलं गेलं होतं. या सामन्यातही दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. तर जसप्रीत बुमराहला विश्रांती देऊन वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संघात स्थान दिले जाऊ शकते.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली/सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर/केएल राहुल, ईशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी/जसप्रीत बुमराह .

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com