
WTC FINAL Ind vs aus 4th test: सध्या भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याचा आज शेवटचा दिवस सुरु आहे. दरम्यान हा सामना सुरु असतानाच भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. (Latest sports updates)
न्यूझीलंड विरुध्द श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना क्राईस्टचर्चच्या मैदानावर पार पडला.
या सामन्यात न्यूझीलंड संघाने शेवटच्या चेंडूवर श्रीलंका संघाला पराभूत करत २ गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे श्रीलंका संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्याच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. तर भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे.
आता भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये अंतिम लढत पाहायला मिळणार आहे.
न्यूझीलंडचा २ गडी राखून जोरदार विजय...
या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना ३५५ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तर देण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाकडून डॅरील मिशेलने तुफानी शतक झळकावले.
या खेळीच्या बळावर न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात ३७३ धावा केल्या होत्या.
दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघाकडून अँजेलो मॅथ्यूजने ११५ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर श्रीलंका संघाने ३०२ धावा केल्या होत्या.
त्यामुळे न्यूझीलंड संघाला विजय मिळवण्यासाठी २८५ धावांची गरज होती. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार केन विलियमसन शेवटच्या चेंडूपर्यंत उभा राहिला आणि आपल्या संघाला २ गडी राखून विजय मिळवून दिला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.